लोकशाही स्पेशल

दिनविशेष 12 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 12 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 12 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप - ओरियन नक्षत्रात असलेल्या ओरियन नेब्युलाचे पहिले फोटो प्रकशित केले.

२०१३: व्हॉयेजर १ प्रोब - नासाचे व्हॉयेजर १ प्रोब हे आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली असे घोषित केले.

२००५: डिस्नेलँड, हाँगकाँग - सुरू झाले.

२००२: मेटसॅट - या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.

१९९८: डॉ. जयंत नारळीकर - यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

१९९२: में कॅरोल जेमिसन - अंतराळात जाणाऱ्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला बनल्या

१९९२: मामोरू मोहरी - अमेरिकन स्पेसशिपमध्ये उड्डाण करणारे पहिले जपानी नागरिक बनले

१९५९: ल्युना-२ - हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.

१९३०: विल्फ्रेड ऱ्होड्स - यांनी शेवटचा, १११०वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.

१९१९: ऍडॉल्फ हिटलर - यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.

१८९७: तिराह मोहीम - सारागडची लढाई: ब्रिटीश सेवेत असलेल्या २१ शीख सैनिकांवर हल्ला करताना दहा हजार पश्तुन आदिवासींपैकी अनेकांचे निधन.

१६६६: मराठा साम्राज्य - आग्ऱ्याहून सुटका: शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.

आज यांचा जन्म

१९१२: फिरोझ गांधी - इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (निधन: ८ सप्टेंबर १९६०)

१८९७: आयरिन क्युरी - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १७ मार्च १९५६)

१८९४: बिभूतिभूषण बंदोपाध्याय - भारतीय बंगाली साहित्यिक (निधन: १ नोव्हेंबर १९५०)

१८१२: रिचर्ड मार्च हो - रोटरी-प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे संशोधक (निधन: ७ जून १८८६)

१७९१: मायकल फॅरेडे - विद्युतशक्तीचे शास्रज्ञ

आज यांची पुण्यतिथी

१९९६: पं. कृष्णराव चोणकर - संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते

१९९६: पद्मा चव्हाण - चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री (जन्म: ७ जुलै १९४८)

१९९२: पं. मल्लिकार्जुन मन्सूर - भारतीय शास्त्रीय गायक - पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)

१९८०: शांता जोग - चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री (जन्म: २ मार्च १९२५)

१९८०: सतीश दुभाषी - चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (जन्म: १४ डिसेंबर १९३९)

१९५२: सवाई गंधर्व - भारतीय शास्त्रीय गायक (जन्म: १९ जानेवारी १८८६)

१९२६: विनायक लक्ष्मण भावे - मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश