सुविचार
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्की गाठतात.
आज काय घडले
१७९९ मध्ये शिख साम्राज्याचे शासक महाराजा रणजितसिंग यांनी लाहोरवर ताबा मिळवला व ते पंजाबचे नवीन सम्राट बनले.
१९६१ मध्ये पुण्यातील पानशेत, खडकवासला ही धरणे फुटली. यामुळे आलेल्या पुरात २ हजार नागरिकांचा मृत्यू झाला.
१९८२ मध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची म्हणजेच नाबार्डची स्थापना झाली. ग्रामीण भागातील कृषी आणि इतर आर्थिक उपक्रमांसाठी पतपुरवठा ही बँक करते.
१९८५ मध्ये पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले. १२ जुलै १९८५ ते २० डिसेंबर १९८६ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
१९९५ मध्ये अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
१९९९ मध्ये भारतीय क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आज यांचा जन्म
अमेरिकन वनस्पतीतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा १९६४ मध्ये जन्म झाला.
चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचा १९०९ मध्ये जन्म झाला. १९५५ साली त्यांचा देवदास हा चित्रपट खुपच गाजला होता.
सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड यांचा १९२० मध्ये जन्म झाला.
क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा १९६५ मध्ये जन्म झाला.
आज यांची पुण्यतिथी
हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे यांचे १९९४ मध्ये निधन झाले.
हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे १९९९ मध्ये निधन झाले. १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपट केले.
भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू, अभिनेता व माजी राज्यसभा सदस्य दारासिंह रंधावा यांचे २०१२ मध्ये निधन झाले.
चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचे २०१३ मध्ये निधन झाले.