लोकशाही स्पेशल

दिनविशेष 12 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : shweta walge

Dinvishesh 12 April 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 12 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९८: केन्द्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.

१९८७: ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.

१९६५: सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.

१९५५: दुसरे महायुद्ध - संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.

१९४१: बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z सादर केले.

१९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.

१७९७: नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.

१६६६: आग्रा शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.

१५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.

१३६४: पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.

आज यांचा जन्म

१९३०: राधाकृष्ण हरिराम तहिलियानी - भारतीय नौसेनाधिपती (निधन: १४ ऑक्टोबर २०१५)

१९०७: विजय भट - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (निधन: १७ ऑक्टोबर १९९३)

१९०७: कॅथरिन हेपबर्न - हॉलिवूड अभिनेत्री (निधन: २९ जून २००३)

१९०५: आत्माराम रावजी भट - भारतीय कृतिशील विचारवंत - पद्मश्री (निधन: १८ जानेवारी १९८३)

१८९५: जे. कृष्णमूर्ती - भारतीय तत्त्वज्ञ (निधन: १७ फेब्रुवारी १९८६)

१८६३: उपेंद्रकिशोर रे - भारतीय चित्रकार आणि संगीतकार (निधन: २० डिसेंबर १९१५)

१८२०: फ्लॉरेंन्स नाईटिगेल - परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक (निधन: १३ ऑगस्ट १९१०)

१७६७: मॅन्युएल गोडॉय - स्पॅनिश जनरल आणि राजकारणी, स्पेन देशाचे माजी पंतप्रधान (निधन: ४ ऑक्टोबर १८५१)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: रमेश लटके - राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार

२०१४: शरत पुजारी - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक (जन्म: ८ ऑगस्ट १९३४)

२०१३: के. बिक्रम सिंग - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २६ मे १९३८)

२०१०: तारा वनारसे (रिचर्डस) - लेखिका

१९७०: नोली सॅच - जर्मन कवी आणि नाटककार - नोबेल पुरस्कार (जन्म: १० डिसेंबर १८९१)

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार

Chandrashekhar Bawankule : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक भाजप लढणार का?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सांगितले...

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात