आज आषाढी एकादशी : आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे.
सुविचार
माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असे नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
आज काय घडले
१९२५ मध्ये अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रताची सुरुवात केली. आयुष्याच्या शेवटपर्यंत मेहेर बाबा शांत राहिले. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत.
१९९२ मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीचा दूरसंचार, बहुउद्देशीय उपग्रह इनसॅट -२ चे प्रक्षेपण झाले. फ्रेंच गयानाच्या कुरुझ येथून एरियन -४ येथून या उपग्रहाचे प्रेक्षपण झाले.
१९९५ मध्ये म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.
आज यांचा जन्म
मराठी कवी व स्त्रीवादी लेखिका पद्मा गोळे यांचा १९१३ मध्ये जन्म झाला. कवितासंग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या.
लेखक, कथाकार लेखक, कथाकार यांचा १९२३ मध्ये जन्म झाला. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेलचे जनक डॉ. रजनीकांत आरोळे यांचा सुपे अहमदनगर येथे १९३४ मध्ये जन्म झाला.
माजी भारतीय क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावसकर यांचा १९४९ मध्ये जन्म झाला. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून १० हजार १२२ धावा काढल्या.
पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा १९५० मध्ये जन्म झाला. पद्मश्री, पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवले गेले आहे.
भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा १९५१ मध्ये जन्म झाला. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
आज यांची पुण्यतिथी
इतिहासकार डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचे १९६९ मध्ये निधन झाले. त्यांनी लिहिलेला "पोर्तुगीज मराठे संबंध: अर्थात पोर्तुगीजांचा दप्तरातील मराठ्यांचा इतिहास" हा ग्रंथ मराठ्यांच्या इतिहास-साधनांमध्ये महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.
साम्यवादी विचारवंत, लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचे १९८९ मध्ये निधन झाले.
संगीतकार व गायक जयवंत कुलकर्णीं यांचे २००५ मध्ये निधन झाले. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले.
भारतीय अभिनेत्री, नर्तक आणि कोरिओग्राफर जोहरा मुमताज सेहगल यांचे २०१४ मध्ये निधन झाले. करिअरच्या ६० वर्षांहून अधिक काळात अभिनेत्री म्हणून त्या बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांमध्ये दिसल्या.