लोकशाही स्पेशल

आज काय घडले : स्वामी विवेकानंद यांनी केली रामकृष्ण मिशनची सुरुवात

Published by : Team Lokshahi

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ जणांनी बलिदान दिले. या हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. तसेच १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. १९८० मध्ये या दिवशी कामगारांचे आंदोलन यशस्वी झाले.

आजचा सुविचार

आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे, जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलाटावर थांबते आणि आपल्याला अनुभवाचे तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते.

आज काय घडले

१७०७ मध्ये इंग्लंड व स्कॉटलंडने एकत्र येउन ग्रेट ब्रिटन या राष्ट्राची निर्मिती केली.

१८८४ मध्ये अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे या मागणीची घोषणा झाली.

१८९७ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची सुरुवात केली. विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांची शिकवण जनमानसात पोचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले.

१९६२ मध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना झाली. नाईक समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदांची स्थापना झाली.

१९८३ मध्ये नागपूर विद्यापीठाचे विभाजन करुन १९८३ मध्ये अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर कालतंराने या विद्यापीठास गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले.

१९९८ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

आज कोणाचा जन्म

अभिनेता बलराज साहनी यांचा १९१३ मध्ये जन्म झाला. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक व संगीतकार मन्ना डे यांचा १९१९ मध्ये जन्म झाला. दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा १९२२ मध्ये जन्म झाला.

केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा १९४४ मध्ये जन्म झाला.

चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्माचा १९८८ मध्ये जन्म झाला. ‘रब ने बना दी जोडी’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

आज यांची पुण्यतिथी

उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे १९७२ मध्ये निधन झाले.

समाजवादी विचारवंत तसेच लेखक नारायण गणेश गोरे यांचे १९९३ मध्ये निधन झाले.

Maharashtra Election: 20 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात मतदान, 23 तारखेला मतमोजणी

Kojagari Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमेला खेळला जाणारा भोंडला नेमका आहे तरी काय? जाणून घ्या...

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ; नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

Kojagiri Purnima : कोजागरी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या