Dinvishesh 1 April 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 1 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान.
१९७६: अँपल इंक - सुरवात.
१९७६: ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.
१९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.
१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
१९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
१९३७: रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.
१९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.
१९३५: भारतीय रिझर्व्ह बँक - सुरवात.
१९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.
१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.
१९२४: रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.
१८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.
१८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.
आज यांचा जन्म
१९५३: हरी चंद - भारतीय धावपटू - आशियाई गेम्स सुवर्ण पदक (निधन: १३ जून २०२२)
१९४१: अजित वाडेकर - भारतीय क्रिकेटपटू
१९३६: तरुण गोगोई - आसामचे १३वे मुख्यमंत्री - पद्म भूषण
१९१२: शिवरामबुवा दिवेकर - रूद्रवीणा वादक (निधन: २६ सप्टेंबर १९८८)
१९०७: शिवकुमार स्वामी - भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक
१८८९: केशव बळीराम हेडगेवार - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (निधन: २१ जून १९४०)
१८१५: ऑटोफोन बिस्मार्क - जर्मनीचे पहिले चान्सलर (निधन: ३० जुलै १८९८)
१६२१: गुरू तेग बहादूर - शीख धर्माचे ९वे गुरु (निधन: २४ नोव्हेंबर १६७५)
१५७८: विल्यम हार्वी - मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ (निधन: ३ जून १६५७)
आज यांची पुण्यतिथी
२०१२: एन. के. पी. साळवे - भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय.चे अध्यक्ष (जन्म: १८ मार्च १९२१)
२०१०: त्झान्नीस त्झाननेटकीस - ग्रीस देशाचे १७५वे पंतप्रधान (जन्म: १३ सप्टेंबर १९२७)
२००६: राजा मंगळवेढेकर - मराठी साहित्यिक (जन्म: ११ डिसेंबर १९२५)
२००३: प्रकाश घांग्रेकर - गायक आणि नट
१९९९: श्रीराम वेलणकर - भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक
१९८९: एस. एम. जोशी - समाजवादी, कामगार नेते आणि पत्रकार (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)
१९८९: श्रीधर महादेव जोशी - संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)
१९८४: पं नारायणराव व्यास - ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ४ एप्रिल १९०२)