लोकशाही मराठी न्यूजची आज 3 वर्षांची गौरवपूर्ण वाटचाल पूर्ण केली असून चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित लावत शुभेच्छा दिल्या आहेत. एवढेच नव्हेतर लोकशाहीच्या स्टुडीओमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः बातम्या सादर केल्या. नमस्कार मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लोकशाहीच्या विशेष बातमीपत्रात स्वागत करतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी बातमीवाचनास सुरुवात केली. व सर्वांच्याच नजरा टीव्हीवर खिळल्या.
नमस्कार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लोकशाहीच्या विशेष बातमीपत्रात स्वागत करतो. अल्पावधीतच महाराष्ट्रातील एक उत्तम वृत्तवाहिनी अशी ओळख असलेल्या लोकशाही मराठीचा आज तिसरा वर्धापन दिन साजरा होत आहे. महाराष्ट्रातील तरुण चॅनेल म्हणून लोकशाही चौथ्या वर्षात पदार्पण करत आहेत. बातमीपत्राच्या माध्यमातून समाज मनाचे पोहोचण्यासाठी लोकशाही वाहिनीने केलेला प्रयत्न अभिनंदनीय आहे. आज देशासह जगभरात महाराष्ट्राचे लौकीक होत असताना सरकारसह गतिमान प्रशासनाची बातमी जगभरात लोकशाहीच्या माध्यमातून पोहोचत आहे.
शेतीच्या बांद्यापासून ते मेट्रोच्या पिलरपर्यंत आणि गतिमान सरकारसह गावखेड्याच्या घडामोडीसह गावच्या बातम्या, आजचा महाराष्ट्र सांगण्याचे काम वाहिनीच्या माध्यामातून होत आहे. राज्यातील आर्थिक मुंबईचा गतिमान विकास होत आहे. त्याच वेगाने आता पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर विकसित करायला सज्ज होत आहे. हा विकास लोकशाहीच्या बातमीपत्रात दिसतो आहे. माध्यमांचा जागर होत असताना लोकशाही जपणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. समाज आणि प्रशासन यातील दुवा बनण्याचे काम लोकशाही वृत्तवाहिनी करेल. दरवर्षी लोकशाहीचा वर्धापन दिन साजरा करताना तो उत्सव बनेल, अशा शुभेच्छा एकनाथ शिंदे यांनी दिल्या.