गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारी संक्रमणामुळे सणासुदीवर पाणी फेरल्या गेले आहे. असे असले तरी सर्व नियम पाळत आज अमरावतीत बकरी ईद मुस्लिम बांधवानी घरीच नमाज अदा करीत साजरी केली. यावेळी राज्यावर आलेले कोरोना संक्रमण दूर होऊ दे अशी प्रार्थना बच्चे कंपनी ने अल्ला कडे केली.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासना सोबत प्रतिष्ठित समाज बांधवानी केले होते त्याच अनुषंगाने आज सकाळी मुस्लिम बांधवानी घरीच ईद ची नमाज अदा केली व एकमेकांना शुभेच्या दिल्यात ज्या ठिकाणी दरवर्षी नमाज अदा केल्या जाते त्या ठिकाणी आज सर्वत्र शुकशुकाट दिसून आला तर गेल्या दिड वर्षातील हि बकरी ईद ची दुसरी नमाज मुस्लिम बांधवांनी घरीच अदा केली.