Ashadhi Ekadashi 2024 
लोकशाही स्पेशल

Ashadhi Ekadashi 2024: आशाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या 'या' मंत्राचा जप करून नकारात्मकतेपासून व्हा दूर...

महाराष्ट्रात लाखो भक्त आषाढ महिन्याची चाहूल लागताच पंढरपुरच्या वाटेला जाण्यासाठी आसुसलेले असतात. जसजशी आषाढी एकादशी जवळ येते तसे लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपुरच्या दिशेने रवाना होतात.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात लाखो भक्त आषाढ महिन्याची चाहूल लागताच पंढरपुरच्या वाटेला जाण्यासाठी आसुसलेले असतात. जसजशी आषाढी एकादशी जवळ येते तसे लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपुरच्या दिशेने रवाना होतात. विठ्ठलाचे दर्शन घेऊन तन, मन आणि धन विठ्ठलाच्या चरणी समर्पित करतात. विठ्ठलाच्या नामघोषात अनेक भक्त तृप्त होतात

तसेच एकादशीनिमित्त वारकरी संप्रदाय यांचे अनोखे खेळ विठूरायाच्या गाभाऱ्यात पाहायला मिळतात. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल या अनेक नावेने विठ्ठलाची व्युत्पत्ती केली जाते. कलयुगात नामसमाधान, विठ्ठलाचे नामस्मरण विठ्ठलाच्या नामाचा जप करणे लाभदायी मानले जाते. विठ्ठलाच्या नामाचा महिमा अगाध आहे. यासाठी विठ्ठलाच्या 'या' काही मंत्राचा जप केल्याने आपल्यातली नकारात्मकता दूर होऊन मन समाधानी, प्रसन्न आणि संतुष्ट होईल.

ॐ भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि ।

तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।

तुळशी-वृंदावन मंत्र

ॐ तुलसीदेव्ये च विद्महे विष्णुप्रियायै च धीमहि ।

तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।

हरि ॐ विठ्ठलाय नम:

जय जय 'राम कृष्ण हरि'

विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल ।।

विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ।।

भाग्यवंता छंद मनी । कोड कानीं ऐकता ।।

विठ्ठल हे दैवत भोळे । चाड काळे न धरावी ।।

तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चिती तो ध्यान ।।

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result