(Amarnath Yatra 2022) भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे (Corona Virus) गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली अमरनाथ यात्रा यावर्षी सूरु होणार आहे. यावेळी ३० जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. 43 दिवस अमरनाथ यात्रा सुरु राहणार असून रंक्षाबंधच्या (Rakshabandhan 2022) दिवशी संपणार आहे. मनोज सिन्हा (Manoj Sinha) जम्मू-काश्मीरचे राज्यपाल यांच्या (Jammu-Kashmir Governer) कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंची ऑनलाइन नोंदणी (Amarnath Yatra Online Booking) एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. या संदर्भात श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने नुकतीच घोषणा केली. प्रवासासाठी निवास क्षमता, आरोग्य सुविधा, दूरसंचार सुविधा, हेली सेवा, आणि सेवा प्रदात्यांच्या फायद्यासाठी यावर्षी अनेक अनोखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रा करण्यास परवानगी दिली असली तरी भाविकांना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. दोन वर्षांनंतर अमरनाथ यात्रेला जायला मिळणार असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.