लोकशाही स्पेशल

दिनविशेष 30 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 30 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 30 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९४४: दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.

१९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.

१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

आज यांचा जन्म

१९७७: अभिषेक चोब्बे - भारतीय संचालक आणि पटकथालेखक

१९४२: वसंत आबाजी डहाके - कोशकार, लेखक आणि कवी

१९३८: क्लाउस स्च्वाब - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे स्थापक

१९०६: के. एस. थिमय्या - भारतीय भूदलाचे ६वे सरसेनापती (निधन: १७ डिसेंबर १९६५)

१८९४: सर्जी इल्युशीन - इल्युशीन विमान कंपनीचे निर्माते (निधन: ९ फेब्रुवारी १९७७)

आज यांची पुण्यतिथी

२०१२: अक्विला बेर्लास किंनी - भारतीय-कॅनेडियन समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक

२००५: ओ. व्ही. विजयन - भारतीय लेखक आणि चित्रकार (जन्म: २ जुलै १९३०)

२००२: आनंद बक्षी - गीतकार (जन्म: २१ जुलै १९२०)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू