लोकशाही स्पेशल

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 29 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 29 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.

१९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.

१९४५: दुसरे महायुद्ध - इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.

आज यांचा जन्म

१९७०: आंद्रे आगासी - अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू

१९६६: फिल टफनेल - इंग्लिश फिरकी गोलंदाज

१९३६: झुबिन मेहता - भारतीय संगीतकार

१९०१: मिचेनोमिया हिरोहितो - दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (निधन: ७ जानेवारी १९८९)

१८४८: राजा रविवर्मा - चित्रकार (निधन: २ ऑक्टोबर १९०६)

१७२७: जीन-जॉर्जेस नोव्हर - फ्रेंच नर्तक आणि बॅलेटचे निर्माते (निधन: १९ ऑक्टोबर १८१०)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: इरफान खान - भारतीय अभिनेते - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ७ जानेवारी १९६७)

२००७: इविका रॅकन - क्रोएशिया देशाचे ७वे पंतप्रधान (जन्म: २४ फेब्रुवारी १९४४)

२००६: जे. के. गालब्रेथ - कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १५ ऑक्टोबर १९०८)

२००१: बेरेंड बिश्यूवेल - नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९२०)

१९८०: श्री. के. क्षीरसागर - जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत (जन्म: ६ नोव्हेंबर १९०१)

१९८०: सर अल्फ्रेड हिचकॉक - चित्रपट दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १८९९)

१९६०: पं. बाळकृष्ण शर्मा - हिंदी कवी (जन्म: ८ डिसेंबर १८९७)

१९४५: हाइनरिक हिमलर - जर्मन नाझी अधिकारी (जन्म: ७ ऑक्टोबर १९००)

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा