लोकशाही स्पेशल

दिनविशेष 28 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 28May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 27 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: UEFA चॅम्पियन्स लीग - रिअल माद्रिद फुटबॉल क्लब विक्रमी १४ वेळेस विजयी.

१९९९: द लास्ट सपर - लिओनार्डो दा विंची यांचे चित्र इटली मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.

१९९८: पाकिस्तान - देशाने बलुचिस्तानच्या चगाई भागात पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.

१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) - स्थापना.

१९५८: स्वातंत्र्यवीर सावरकर - यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

१९५२: ग्रीस - देशांत स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

१९४०: दुसरे महायुद्ध - बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) - या जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.

१९०७: आइल ऑफ मॅन टीटी - पहिली रेस आयोजित करण्यात आली.

१४९०: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.

आज यांचा जन्म

१९५८: गौतम शोम (सीनियर) - भारतीय क्रिकेट खेळाडू (निधन: १० फेब्रुवारी २०२३)

१९४६: के. सच्चिदानंदन - भारतीय कवी आणि समीक्षक

१९२३: एन. टी. रामाराव - आंध्रप्रदेशचे १०वे मुख्यमंत्री (निधन: १८ जानेवारी १९९६)

१९२१: पं. दत्तात्रय पलुसकर - शास्त्रीय गायक (निधन: २५ ऑक्टोबर १९५५)

१९०८: इयान फ्लेमिंग - दुसऱ्या महायुध्दातील गुप्तहेर आणि जेम्स बाँडचे जनक (निधन: १२ ऑगस्ट १९६४)

१९०७: नानासाहेब पुरोहित - स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक (निधन: २७ नोव्हेंबर १९९४)

१८८३: विनायक दामोदर सावरकर - भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर (निधन: २६ फेब्रुवारी १९६६)

१७५९: विल्यम पिट द यंगर - युनायटेड किंगडमचे पंतप्रधान (निधन: २३ जानेवारी १८०६)

१६६०: जॉर्ज (पहिला) - इंग्लंडचा राजा (निधन: ११ जून १७२७)

आज यांची पुण्यतिथी

२००३: इल्या प्रिगोगिन - रशियन-बेल्जियन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २५ जानेवारी १९१७)

१९९९: बी. विट्टालाचारी - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: १८ जानेवारी १९२०)

१९९६: जोसेफ ब्रॉडस्की - रशियन-अमेरिकन कवी आणि निबंधकार - नोबेल पारितोषिक (जन्म: २४ मे १९४०)

१९९४: गणपतराव नलावडे - हिंदूसभेचे नेते

१९६१: परशुराम कृष्णा गोडे - प्राच्यविद्या संशोधक (जन्म: ११ जुलै १८९१)

१७८७: लिओपोल्ड मोत्झार्ट - ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: १४ नोव्हेंबर १७१९)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू