लोकशाही स्पेशल

दिनविशेष 27 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 27 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 27 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: मुंबईत चार मजली निवासी इमारत कोसळून किमान १९ लोकांचे निधन.

२०२२: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीच्या ४ लोकांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन.

२०२२: मंकीपॉक्स - या रोगामुळे पहिले निधन झाल्याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रमाणित केले.

२०१४: गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड पाइपलाइन स्फोट - भारतातील आंध्र प्रदेश मध्ये झालेल्या स्फोटात किमान १४ लोकांचे निधन.

२०१३: इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ - नासाचे स्पेस प्रोब सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपीत.

१९९६: द. रा. पेंडसे - यांना महाराष्ट्रचेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.

१९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

१९८२: स्पेस शटल कोलंबिया - नासाचे अतंराळयान अंतिम संशोधन आणि विकास उड्डाण मोहिमेसाठी प्रक्षेपित.

१९७७: जिबूती - देशाला फ्रान्सने स्वातंत्र्य दिले.

१९७७: जिबुटी - देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.

१९७३: उरुग्वे - देशाच्या अध्यक्ष जुआन मारिया बोर्डाबेरी यांनी संसद विसर्जित करून हुकूमशाही प्रस्थापित केली.

१९५४: ओबनिंस्क न्यूक्लियर पॉवर प्लांट - अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्को, रशिया येथे सुरू झाले.

१९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

१९४६: कॅनडा नागरिकत्व कायद - कॅनडा देशाच्या संसदेने कॅनडाच्या नागरिकत्वाची व्याख्या स्थापित केली.

१९४१: रोमानियन अधिकार्यांनी किमान १३,२६६ ज्यू लोकांची हत्या केली. हा इतिहासातील सर्वात हिंसक घटना आहे.

१९४१: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन बार्बरोसा: दरम्यान जर्मन सैन्याने बियालिस्टोक शहर काबीज केले.

आज यांचा जन्म

१९९२: कार्तिका नायर - भारतीय चित्रपट अभिनेत्री

१९६२: सुनंदा पुष्कर - भारतीय-कॅनेडियन उद्योगपती (निधन: १७ जानेवारी २०१४)

१९५७: सुलतान बिन सलमान अल सौद - अंतराळात जाणारे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम

१९४३: रवी बत्रा - भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक

१९३९: राहुल देव बर्मन - भारतीय हिंदी चित्रपट संगीतकार (निधन: ४ जानेवारी १९९४)

१९१९: अमला शंकर - भारतीय नृत्यांगना (निधन: २४ जुलै २०२०)

१९१७: खंडू रांगणेकर - भारतीय क्रिकेटपटू (निधन: ११ ऑक्टोबर १९८४)

१८९९: जुआन पेप्पे - पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेजचे संस्थापक (निधन: ३ एप्रिल १९८१)

१८८०: हेलन केलर - अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका (निधन: १ जून १९६८)

१८७५: कवी दत्त - (निधन: १३ मार्च १८९९)

१८६९: हॅन्स स्पेमन - जर्मन प्राणीशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक

१८६४: शिवराम महादेव परांजपे - काळ या साप्ताहिकाचे संपादक (निधन: २७ सप्टेंबर १९२९)

१८६४: शि. म. परांजपे - लेखक व पत्रकार (निधन: २७ सप्टेंबर १९२९)

१८३८: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय - बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार (निधन: ८ एप्रिल १८९४)

१५५०: चार्ल्स (नववा) - फ्रान्सचा राजा (निधन: ३० मे १५७४)

१४६२: लुई (बारावा) - फ्रान्सचा राजा (निधन: १ जानेवारी १५१५)

आज यांची पुण्यतिथी

२००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशा - ७वे लष्करप्रमुख (चीफ ऑफ मिलटरी स्टाफ) - पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: ३ एप्रिल १९१४)

२०००: द. ना. गोखले - चरीत्र वाङ्मयाचे संशोधक (जन्म: २० सप्टेंबर १९२२)

१९९८: होमी जे. एच. तल्यारखान - सिक्कीमचे पहिले राज्यपाल (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)

१९९६: अल्बर्ट आर. ब्रोकोली - जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते (जन्म: ५ एप्रिल १९०९)

१९५७: हर्मन बुहल - फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (जन्म: २१ सप्टेंबर १९२४)

१८३९: महाराजा रणजितसिंग - शिख राज्याचे संस्थापक (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)

१७०८: धनाजी जाधव - मराठा साम्राज्यातील सेनापती

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती