लोकशाही स्पेशल

दिनविशेष 23 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 23 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 23 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.

१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

१९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.

१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

१९५३: पाकिस्तान - देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान करण्यात आले.

१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.

१९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.

१९१९: बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.

१८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.

१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.

१८३९: बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.

आज यांचा जन्म

१९८७: कंगना रणावत - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

१९७६: स्मृती इराणी - भारतीय अभिनेत्री, निर्माते आणि राजकारणी

१९६८: माईक ऍॅथरटन - इंग्लिश क्रिकेटपटू

१९५४: केनेथ कोल - अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शनचे स्थापक

१९५३: किरण मुजुमदार शॉ - भारतीय महिला उद्योजक - पद्म भूषण, पद्मश्री

१९३१: व्हिक्टर कॉर्चनॉय - रशियन बुद्धीबळपटू

१९२९: गोविंद स्वरूप - भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ (निधन: ७ सप्टेंबर २०२०)

१९२३: हेमू कलाणी - क्रांतिकारक (निधन: २१ जानेवारी १९४३)

१९१६: हरकिशनसिंग सुरजित - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (निधन: १ ऑगस्ट २००८)

१९१२: फॉन ब्रॉन - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंतेवर्नर

१९१०: राम मनोहर लोहिया - भारतीय समाजवादी नेते व लेखक (निधन: १२ ऑक्टोबर १९६७)

१९०१: बॉन महाराजा - भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक (निधन: ७ जुलै १९८२)

१८९८: नलिनीबाला देवी - आसामी कवयित्री आणि लेखिका (निधन: २४ डिसेंबर १९७७)

१८९३: गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू - भारतीय व्यापारी (निधन: ४ जानेवारी १९७४)

१८८३: गोविंद पै - कन्नड कवी आणि राष्ट्रकवी (निधन: ६ सप्टेंबर १९६३)

१८८१: हेर्मान स्टॉडिंगर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार

१८८१: रॉजर मार्टिन दु गार्ड - फ्रेंच लेखक - नोबेल पुरस्कार

१७४९: पिएर सिमॉन दि लाप्लास - फ्रेंच गणितज्ञ

१६९९: जॉन बार्ट्राम - अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ

आज यांची पुण्यतिथी

२०२२: रमेश चंद्र लाहोटी - भारताचे ३५वे सरन्यायाधीश (जन्म: १ नोव्हेंबर १९४०)

२०१५: ली कुआन यी - सिंगापूरचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ सप्टेंबर १९२३)

२०१४: अडॉल्फो साराझ - स्पेनचे पहिले पंतप्रधान (जन्म: २५ सप्टेंबर १९३२)

२०१३: जोई वीडर - इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक (जन्म: २९ नोव्हेंबर १९१९)

२०११: एलिझाबेथ टेलर - ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: २७ फेब्रुवारी १९३२)

२००८: गणपत पाटील - मराठी चित्रपट अभिनेते

२००६: डेसमंड डॉस - अमेरिकन सैनिकी डॉक्टर - मेडल ऑफ ऑनर (जन्म: ७ फेब्रुवारी १९१९)

१९९१: प्रकाश सिंग - व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक (जन्म: ३१ मार्च १९१३)

१९३१: भगत सिंग - क्रांतिकारक (जन्म: २८ सप्टेंबर १९०७)

१९३१: शिवराम हरी राजगुरू - क्रांतिकारक (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)

१९३१: सुखदेव थापर - भारतीय क्रांतिकारक (जन्म: १५ मे १९०७)

१९१४: संत रफ्का - लेबनॉनच्या पहिल्या महिला संत (जन्म: २९ जून १८३२)

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा