18th June 2023 Dinvishesh: सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 18 जून या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं
२००९: लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) - नासाने रोबोटिक अंतराळयान प्रक्षेपित केले.
२००६: कझाकस्तान - देशाने पहिला उपग्रह KazSat-1 प्रक्षेपित केला.
१९८३: सॅली राइड - या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर आहेत.
१९८१: जनावरांमधे आढळणाऱ्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
१९७९: दुसरी स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन चर्चा (SALT II) - अमेरिका आणि सोव्हिएत युनियन देशांनी स्वाक्षरी केली.
१९५६: रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
१९५३: इजिप्त - प्रजासत्ताक बनले.
१९४६: डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
१९३०: चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
१९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालय - स्थापना.
१८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.
१८१५: नेपोलियन - यांचा वॉटर्लूच्या लढाईत पराभव.
आज यांचा जन्म
१९६५: उदय हुसेन - सद्दाम हुसेन यांचा मुलगा (निधन: २२ जुलै २००३)
१९४२: थाबो म्बेकी - दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
१९४२: पॉल मॅकार्टनी - संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य
१९३१: के. एस. सुदर्शन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक (निधन: १५ सप्टेंबर २०१२)
१९११: कमला सोहोनी - पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (निधन: ८ सप्टेंबर १९९७)
१८९९: दादा धर्माधिकारी - स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (निधन: १ डिसेंबर १९८५)
१८८७: अनुग्रह नारायण सिन्हा - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: ५ जुलै १९५७)
१८४५: चार्ल्स लुई अल्फोन्स लावेरन - फ्रेंच वैद्य आणि परजीवीशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: १८ मे १९२२)
आज यांची पुण्यतिथी
२०२१: मिल्खा सिंग - भारतीय धावपटू, द फ्लाइंग शीख - पद्मश्री (जन्म: ८ ऑक्टोबर १९३५)
२०२०: लच्छमानसिंग लेहल - मेजर-जनरल - वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा (जन्म: ९ जुलै १९२३)
२०१६: जेपियार - सत्यबामा विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु (जन्म: ११ जून १९३१)
२००९: उस्ताद अली अकबर खान - मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक - पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: १४ एप्रिल १९२२)
२००५: सय्यद मुश्ताक अली - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री (जन्म: १७ डिसेंबर १९१४)
२००३: जानकीदास - हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेते
१९९९: श्रीपाद रामकृष्ण काळे - साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार
१९७४: गोविंद दास - स्वातंत्र्यसैनिक आणि साहित्यिक (जन्म: १६ ऑक्टोबर १८९६)
१९६२: नानासाहेब घारपुरे - पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक
१९५८: डग्लस जार्डिन - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ ऑक्टोबर १९००)
१९३६: मॅक्झिम गॉर्की - रशियन लेखक (जन्म: २८ मार्च १८६८)
१९०२: सॅम्युअल बटलर - इंग्लिश लेखक (जन्म: ४ डिसेंबर १८३५)
१९०१: रामचंद्र भिकाजी गुंजीकर - मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक (जन्म: १० एप्रिल १८४३)
१८५८: राणी लक्ष्मीबाई - झाशीची महाराणी (जन्म: १८ नोव्हेंबर १८२८)
१६७३: जीन मॅन्स - फ्रेंच नर्स, कॅनडा मधील पहिले सामान्य रुग्णालयाच्या संस्थपिका (जन्म: १२ नोव्हेंबर १६०६)