लोकशाही स्पेशल

दिनविशेष 16 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 16 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 16 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.

१९९५: निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) - सुरवात.

१९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

१८५३: भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

आज यांचा जन्म

१९९१: आशिष खाचणे - भारतीय चित्रपट आणि नाटक अभेनेते

१९७८: लारा दत्ता - मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री

१९७२: कोंचिता मार्टिनेझ - स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू

१९६३: सलीम मलिक - पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९६१: जर्बोम गॅमलिन - अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३० नोव्हेंबर २०१४)

१९४८: रेग अल्कॉक - कॅनेडियन उद्योगपती आणि राजकारणी, ट्रेझरी बोर्डाचे १७वे कॅनेडियन अध्यक्ष (निधन: १४ ऑक्टोबर २०११)

१९४६: जॉनी लुईस - लायबेरिया देशाचे १८वे मुख्य न्यायाधीश (निधन: २१ जानेवारी २०१५)

१९४२: फ्रॅंक विल्यम्स - विल्यम्स एफ-१ रेसिंग टीमचे स्थापक

१९४०: राणी मार्ग्रेट (दुसरी) - डेन्मार्कची राणी

१९३४: राम नाईक - भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री

१९२६: पियरे फॅब्रे - फ्रेंच फार्मासिस्ट, Laboratoires Pierre Fabre चे संस्थापक (निधन: २० जुलै २०१३)

१९२४: मदनजीत सिंग - भारतीय राजनयिक

१९२२: लिओ टिंडेमन्स - बेल्जियम देशाचे ४३वे पंतप्रधान (निधन: २६ डिसेंबर २०१४)

१९२०: आनंदा दासानायके - श्रीलंकेचे राजकारणी (निधन: ९ ऑगस्ट २०१२)

आज यांची पुण्यतिथी

६९: ओथो - रोमन सम्राट (जन्म: २८ एप्रिल ३२)

२०१५: स्टॅनिस्लाव ग्रॉस - झेक प्रजासत्ताक देशाचे ५वे पंतप्रधान (जन्म: ३० ऑक्टोबर १९६९)

२०१३: अली काफी - पाकिस्तानी राजकारणी (जन्म: ७ ऑक्टोबर १९२८)

२०१३: पेड्रो रामिरेझ वाझक्वेझ - मेक्सिकन वास्तुविशारद, टिजुआना कल्चरल सेंटर आणि नॅशनल म्युझियम ऑफ एन्थ्रोपोलॉजीचे रचनाकार (जन्म: १६ एप्रिल १९१९)

२०१२: जॉर्ज कुंडा - झांबिया देशाचे ११वे उपराष्ट्रपती (जन्म: २६ फेब्रुवारी १९५६)

२०१०: डॅरिल गेट्स - अमेरिकन पोलीस अधिकारी, D.A.R.E. कार्यक्रमाचे निर्माते (जन्म: ३० ऑगस्ट १९२६)

२००७: चंद्रबोस सुताहरण - श्रीलंकन पत्रकार

२००२: रुथ फर्टेल - अमेरिकन उद्योगपती, रूथच्या ख्रिस स्टीक हाऊसचे संस्थापक (जन्म: ५ फेब्रुवारी १९२७)

२०००: अप्पासाहेब पवार - लेखक

१९९५: रमेश टिळेकर - अभिनेते आणि वकील

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा