Dinvishesh 15 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 15 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
३९९: सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
१९६५: कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
१९४२: दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
१९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
१८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.
आज यांचा जन्म
१९७९: हामिश मार्शल - न्यूझीलंडचे क्रिकेटपटू
१९५६: डेसमंड हेन्स - वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू
१९३४: निकालूस विर्थ - स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते
१८६१: सर हॅल्फोर्ड जॉन मॅकेंडर - इंग्रजी भूगोलशास्त्रज्ञ, बॅटियन शिखर पहिल्यांदा चढाई करणारे (निधन: ६ मार्च १९४७)
१८६१: चार्ल्स एडवर्ड गिलॉम - स्विस-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १३ मे १९३८)
१८२४: राजेन्द्रलाल मित्रा - प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (निधन: २६ जुलै १८९१)
१८२०: सुसान बी. अँथनी - अमेरिकन समाजसुधारक आणि महिला हक्क कार्यकर्त्या (निधन: १३ मार्च १९०६)
आज यांची पुण्यतिथी
२०२३: पॉल बर्ग - अमेरिकन बायोकेमिस्ट - नोबेल पारितोषिक (जन्म: ३० जून १९२६)
२०२३: कलाडी जयन - भारतीय अभिनेते
२०२३: गुम्मडी कुथुहलम्मा - भारतीय राजकारणी, आंध्र प्रदेशचे आमदार (जन्म: १ जून १९४९)
१९८८: रिचर्ड फाइनमन - अमेरिकन पदार्थवैज्ञानिक - नोबेल पुरस्कार (जन्म: ११ मे १९१८)
१९८०: मनोहर दिवाण - कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय
१९८०: कॉंम्रेड एस. एस. मिरजकर - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य
१९५३: सुरेशबाबू माने - किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक
१९४८: सुभद्राकुमारी चौहान - हिंदी कवयित्री (जन्म: १६ ऑगस्ट १९०४)
१९२९: मेलविले एलिया स्टोन - शिकागो डेली न्यूजचे स्थापक (जन्म: २२ ऑगस्ट १८४८)
१८६९: मिर्झा गालिब - भारतीय उर्दू कवी (जन्म: २७ डिसेंबर १७९७)