Dinvishesh 14 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 14 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०२२: कॅनडा - कोविड-१९ महामारीच्या आदेश आणि निर्बंधांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करत असलेल्या लोकाना रोकण्यासाठी, पंतप्रधान जस्टीन ट्रूदेऊ यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आपत्कालीन कायदा लागू केला.
२००३: नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या सरस्वती सन्मानासाठी निवड.
२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
१९८९: ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.
१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.
१९४६: पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
१९४५: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.
१८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.
१८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.
१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.
आज यांचा जन्म
१९५२: सुषमा स्वराज - दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या - पद्म विभूषण (निधन: ६ ऑगस्ट २०१९)
१९५०: कपिल सिबल - वकील आणि केंद्रीय मंत्री
१९४७: फाम तुआन - अंतराळात जाणारे पहिले व्हिएतनामी नागरिक आणि पहिले आशियाई व्यक्ती
१९३३: मधुबाला - भारतीय अभिनेत्री (निधन: २३ फेब्रुवारी १९६९)
१९२५: मोहन धारिया - भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री (निधन: १४ ऑक्टोबर २०१३)
१९१४: जान निसार अख्तर - ऊर्दू शायर व गीतकार (निधन: ९ ऑगस्ट १९७६)
१८८५: सैयद जफरुल हसन - भारतीय तत्त्वज्ञ (निधन: १९ जून १९४९)
१४८३: बाबर - पहिला मुघल सम्राट आणि संस्थापक (निधन: २६ डिसेंबर १५३०)
१९५२: सुषमा स्वराज - दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या - पद्म विभूषण (निधन: ६ ऑगस्ट २०१९)
१९५०: कपिल सिबल - वकील आणि केंद्रीय मंत्री
१९४७: फाम तुआन - अंतराळात जाणारे पहिले व्हिएतनामी नागरिक आणि पहिले आशियाई व्यक्ती
१९३३: मधुबाला - भारतीय अभिनेत्री (निधन: २३ फेब्रुवारी १९६९)
१९२५: मोहन धारिया - भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री (निधन: १४ ऑक्टोबर २०१३)
आज यांची पुण्यतिथी
२०२३: जावेद खान अमरोही - भारतीय अभिनेते
२०२३: कुदारीकोटी अन्नदानय्या स्वामी - भारतीय न्यायशास्त्रज्ञ, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
२०२३: शोइचिरो टोयोडा - टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष (जन्म: २७ फेब्रुवारी १९२५)
१९७५: ज्यूलियन हक्सले - ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म: २२ जून १८८७)
१९७५: पी. जी. वूडहाऊस - इंग्लिश लेखक (जन्म: १५ ऑक्टोबर १८८१)
१९७४: श्रीकृष्ण रातंजनकर - भारतीय शास्त्रीय गायक - पद्म भूषण (जन्म: १ जानेवारी १९००)
१४०५: तैमूरलंग - मंगोलियाचा राजा (जन्म: ८ एप्रिल १३३६)