लोकशाही स्पेशल

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 13 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 13 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०००: उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

१९९८: भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण, राजस्थान येथे केली.

१९९६: ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.

१९९५: ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.

१९७०: नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

१९६७: डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.

१९६२: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९५२: भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.

१९५०: फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिली रेस सिल्व्हरस्टोन येथे झाली.

१९३९: अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.

१८८०: थॉमस अल्वा एडिसन - यांनी विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.

आज यांचा जन्म

१९८४: बेनी दयाल - भारतीय गायक

१९७३: संदीप खरे - गीतलेखक, कवी

१९५६: कैलाश विजयवर्गीय - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस

१९५१: आनंद मोडक - भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक

१९१६: सच्चिदानंद राऊत - भारतीय उडिया भाषा कवी (निधन: २१ ऑगस्ट २००४)

१९०५: फक्रुद्दीन अली अहमद - भारताचे ५वे राष्ट्रपती (निधन: ११ फेब्रुवारी १९७७)

१८५७: सर रोनाल्ड रॉस - हिवताप रोगाचे जंतुं शोधणारे शास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १६ सप्टेंबर १९३२)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नाह्यान - संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) २रे अध्यक्ष, अबू धाबीचे शासक (जन्म: ७ सप्टेंबर १९४८)

२०१३: जगदीश माळी - भारतीय छायाचित्रकार (जन्म: १८ जानेवारी १९५४)

२०१०: विनायक कुलकर्णी - कवी आणि बालकुमार-साहित्यिक (जन्म: ७ ऑक्टोबर १९१७)

२००१: आर. के. नारायण - भारतीय भारतीय लेखक - पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १० ऑक्टोबर १९०६)

१९७४: सुकांता भट्टाचार्य - भारतीय कवी आणि नाटककार (जन्म: १५ ऑगस्ट १९२६)

१९५०: देवदत्त रामकृष्ण भांडारकर - प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक (जन्म: १९ नोव्हेंबर १८७५)

१९३९: आर्थर शेर्बियस - एनिग्मा मशीनचा शोध लावणारे जर्मन विद्युत अभियंते (जन्म: ३० ऑक्टोबर १८७८)

१९३८: चार्ल्स एडवर्ड गिलॉम - स्विस-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: १५ फेब्रुवारी १८६१)

१९३०: फ्रिडटजॉफ नॅनसेन - नॉर्वेजियन शास्त्रज्ञ, संशोधक - नोबेल पारितोषिक (जन्म: १० ऑक्टोबर १८६१)

१९०३: अपोलिनेरियो माबिनी - फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान (जन्म: २३ जुलै १८६४)

१६२६: मलिक अंबर - अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा