लोकशाही स्पेशल

दिनविशेष 13 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 13 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 13 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी.

२००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

१९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

१९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.

१७३९: कर्नालची लढाई पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.

१६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुऱ्या;हाणपूर येथे पोहोचला.

आज यांचा जन्म

१९४५: विनोद मेहरा - अभिनेते (निधन: ३० ऑक्टोबर १९९०)

१९२३: चक येगर - ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक (निधन: ७ डिसेंबर २०२०)

१८९४: वासुदेव बेंद्रे - इतिहासकार (निधन: १६ जुलै १९८६)

१८७९: सरोजिनी नायडू - प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी (निधन: २ मार्च १९४९)

१८३५: मिर्झा गुलाम अहमद - भारतीय धर्मगुरू, अहमदिया चळवळीचे संस्थापक (निधन: २६ मे १९०८)

१७६६: थॉमस माल्थस - प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (निधन: २३ डिसेंबर १८३४)

इ. स. पू ७११: जिम्मू - जपानचा पहिला सम्राट (निधन: ९ एप्रिल इ. स. पू ५८५)

आज यांची पुण्यतिथी

२०२३: ललिता लाजमी - भारतीय चित्रकार (जन्म: १७ ऑक्टोबर १९३२)

२०१२: अखलाक मुहम्मद खान - ऊर्दू कवी - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: १६ जून १९३६)

२००८: राजेन्द्र नाथ - विनोदी अभिनेते

१९८७: एम. भक्तवत्सलम - भारतीय राजकारणी, मद्रास राज्यचे ४थे मुख्यमंत्री (जन्म: ९ ऑक्टोबर १८९७)

१९७४: उस्ताद अमीर खान - इंदौर घराण्याचे संस्थापक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)

१९६८: गोपाळकृष्ण भोबे - संगीत समीक्षक, गीतकार वव कथालेखक

१९६७: योशूसुका अकावा - निसान मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ६ नोव्हेंबर १८८०)

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा