लोकशाही स्पेशल

दिनविशेष 12 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 12 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 12 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.

१९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

१९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.

१९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.

१९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

१९४५: अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्टकार्यालयात असतानाच निधन झाले.

१६०६: ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.

आज यांचा जन्म

१९५४: सफदर हश्मी - मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक, दिगदर्शक आणि गीतकार (निधन: २ जानेवारी १९८९)

१९४३: सुमित्रा महाजन - केंद्रीय मंत्री

१९३५: लालजी टंडन - मध्य प्रदेशचे २२वे राज्यपाल (निधन: २१ जुलै २०२०)

१९३२: लक्ष्मण कादिरमगार - श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते

१९१७: विनू मांकड - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २१ ऑगस्ट १९७८)

१९१४: कवी संजीव - संवाद व गीतलेखक (निधन: २८ फेब्रुवारी १९९५)

१९१२: हमेंगकुबुवोनो नववा - इंडोनेशिया देशाचे २रे उपाध्यक्ष (निधन: २ ऑक्टोबर १९८८)

१९१०: पु. भा. भावे - सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (निधन: १३ ऑगस्ट १९८०)

१८९२: रॉबर्ट वॉटसन-वॅट - रडार यंत्रणेचे शोधक (निधन: ५ डिसेंबर १९७३)

आज यांची पुण्यतिथी

२००१: हार्वे बॉल - स्माईलीचे जनक (जन्म: १० जुलै १९२१)

१९८९: ऍबी हॉफमन - युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक (जन्म: ३० नोव्हेंबर १९३६)

१९४५: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट - अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० जानेवारी १८८२)

१९१२: क्लारा बार्टन - अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका (जन्म: २५ डिसेंबर १८२१)

१९०६: महेशचंद्र भट्टाचार्य - भारतीय विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)

१७२०: बाळाजी विश्वनाथ भट - मराठा साम्राज्याचे ६वे पेशवा (जन्म: १ जानेवारी १६६२)

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result