लोकशाही स्पेशल

दिनविशेष 11 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 11 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 11 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००८: फर्मी गामा रे स्पेस टेलिस्कोप - प्रक्षेपित करण्यात आला.

२००४: कॅसिनी-हायगेन्स - अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

२००२: अँटोनियो म्यूची - यांना टेलिफोनचे पहिले शोधकर्ता म्हणून युनायटेड स्टेट्स कॉंग्रेसने मान्यता दिली.

१९९८: कॉम्पॅक कॉम्पुटर - या कंपनीने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.

१९९७: भारतीय हवाई दल - सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने दाखल.१९८७: बर्नी ग्रँट - ग्रेट ब्रिटन मधील पहिले कृष्णवर्णीय संसदेत निवडून आले.

१९८१: गोलबाफ भूकंप - इराणमधील झालेल्या ६.९ तीव्रतेच्या भूकंपात किमान २००० लोकांचे निधन.

१९८१: डायन ऍबॉट - ग्रेट ब्रिटन मधील पहिल्या कृष्णवर्णीय महिला संसदेत निवडून आल्या.

१९८१: पॉल बोटेंग - ग्रेट ब्रिटन मधील पहिले कृष्णवर्णीय कॅबिनेट मंत्री म्हणून निवडून आले.

१९७०: एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन - यांना अधिकृतपणे अमेरिकेतील यूएस आर्मी ब्रिगेडियर जनरल म्हणून मन मिळाला, हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या.

१९७०: ऍना मे हेस - यांना अधिकृतपणे अमेरिकेतील यूएस आर्मी जनरल म्हणून मन मिळाला, हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या.

१९६३: अमेरिकन नागरी हक्क चळवळ - नॅशनल गार्ड सैन्याच्या संरक्षणात विवियन मालोन आणि जेम्स हूड या दोन कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांनी अलाबामा विद्यापीठ नोंदणी केली.

१९६३: १९६४ चा नागरी हक्क कायदा, अमेरिका - प्रस्तावित केला गेला.

१९५५: २४ तास ऑफ ले मॅन्स - या रेस मध्ये झालेल्या अपघातात, ८३प्रेक्षकांचे निधन तर १००प्रेक्षक जखमी, मोटरस्पोर्ट्स रेस मध्ये झालेला हा सगळ्यात घातक आणि मोठा अपघात आहे.

आज यांचा जन्म

१९९३: सिद्धू मूसवाला - पंजाबी गायक (निधन: २९ मे २०२२)

१९८२: मार्को आर्मेंट - टंबलरचे सहसंस्थापक

१९४८: लालूप्रसाद यादव - बिहारचे २०वे मुख्यमंत्री

१९३१: जेपियार - सत्यबामा विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु (निधन: १८ जून २०१६)

१८९७: राम प्रसाद बिस्मिल - भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक (निधन: १९ डिसेंबर १९२७)

१८९५: निकोलाई बुल्गानिन - सोव्हिएत युनियनचे ६वे पंतप्रधान (निधन: २४ फेब्रुवारी १९७५)

१८९४: काइचिरो टोयोडा - टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक (निधन: २७ मार्च १९५२)

१८१५: जुलिया मार्गारेट कॅमेरॉन - भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार (निधन: २६ जानेवारी १८७९)

आज यांची पुण्यतिथी

२०१३: विद्या चरण शुक्ला - भारतीय राजकारणी (जन्म: २ ऑगस्ट १९२९)

२०००: राजेश पायलट - केंद्रीय मंत्री (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)

१९९७: मिहिर सेन - एका वर्षात पाच खंडातील महासागर पोहणारे एकमेव व्यक्ती - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)

१९८३: घनश्यामदास बिर्ला - भारतीय उद्योगपती - पद्म विभूषण (जन्म: १० एप्रिल १८९४)

१९७४: पार लगेरक्विस्ट - स्वीडिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी - नोबेल पारितोषिक (जन्म: २३ मे १८९१)

१९७०: लीला रॉय नाग - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि राजकारणी (जन्म: २ ऑक्टोबर १९००)

१९५०: साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने) - मराठी बालसाहित्यिक (जन्म: २४ डिसेंबर १८९९)

१९२४: वासुदेवशास्त्री खरे - इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)

१९०३: अलेक्झांडर (पहिला) - सर्बियाचा राजा (जन्म: १४ ऑगस्ट १८७६)

१९०३: ड्रगा माशिन - अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी (जन्म: ११ सप्टेंबर १८६४)

१७९६: सॅम्युअल व्हिटब्रेड - व्हिटब्रेड हॉटेल्सचे संस्थापक (जन्म: ३० ऑगस्ट १७२०)

१७२७: जॉर्ज (पहिला) - इंग्लंडचा राजा (जन्म: २८ मे १६६०)

इ. स. पू ३२३: अलेक्झांडर द ग्रेट - मॅसेडोनियाचा राजा (जन्म: २० जुलै इ. स. पू ३५६)

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा