लोकशाही स्पेशल

दिनविशेष 07 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 07 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 07 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.

१९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.

१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

१९२०: बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.

१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिऱ्या;याची अंगठी.

१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

आज यांचा जन्म

१९३८: एस. रामचंद्रन पिल्ले - कम्युनिस्ट नेते

१९३४: सुजित कुमार - चित्रपट अभिनेते व निर्माते (निधन: ५ फेब्रुवारी २०१०)

१९२६: जी. एस. शिवारुद्रप्पा - भारतीय कवी आणि शिक्षक (निधन: २३ डिसेंबर २०१३)

१९१९: डेसमंड डॉस - अमेरिकन सैनिकी डॉक्टर - मेडल ऑफ ऑनर (निधन: २३ मार्च २००६)

१९०६: ओलेग अँतोनोव्ह - रशियन विमानशास्त्रज्ञ आणि अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक (निधन: ४ एप्रिल १९८४)

१८७३: थॉमस ऍन्ड्रयूज - आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार (निधन: १५ एप्रिल १९१२)

१८१२: चार्ल्स डिकन्स - इंग्लिश कादंबरीकार व लेखक (निधन: ९ जून १८७०)

१८०४: जॉन डीयेर - डीयेर एंड कंपनीची स्थापक (निधन: १७ मे १८८६)

१६९३: ऍना - रशियाची सम्राज्ञी

आज यांची पुण्यतिथी

१९९९: हुसेन - जॉर्डनचे राजे (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)

१९३८: हार्वे फायरस्टोन - फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक (जन्म: २० डिसेंबर १८६८)

१३३३: निक्को - निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक

१२७४: श्री चक्रधर स्वामी - महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म: ४ सप्टेंबर १२२१)

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा