लोकशाही स्पेशल

दिनविशेष 02 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 02 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 02 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: तुर्की / तुर्किये - देशाने तुर्की हे नाव अधिकृतपणे बदलून तुर्किये असे ठेवले.

२०१४: तेलंगणा - भारताचे २९वे राज्य झाले.

२००३: मार्स एक्सप्रेस - युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रोब प्रक्षेपित, युरोपने दुसऱ्या ग्रहावर, मंगळावर जाण्याचा पहिला प्रवास सुरू केला.

२०००: अमृता प्रीतम - यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.

१९९९: भूतान - देशामध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.

१९७९: पोप जॉन पॉल (दुसरे) - यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

१९६६: सर्वेअर प्रोग्राम - सर्वेअर 1 चंद्रावर उतरले, दुसऱ्या जगावर सॉफ्ट-लँड करणारे पहिलेअमेरिकन स्पेसक्राफ्ट बनले.

१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) - स्थापना झाली.

१९५३: राणी एलिझाबेथ (दुसरी) - यांचा इंग्लंडमध्ये राज्याभिषेक.

१९४९: दक्षिण आफ्रिका - देशामध्ये उच्च्वर्णीय लोकांना सोडून इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

१९४६: इटली - देशाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.

१९२४: भारतीय नागरिकत्व कायदा, अमेरिका - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी भारतीय नागरिकत्व कायद मंजूर केला आणि अमेरिकेच्या प्रादेशिक मर्यादेत जन्मलेल्या सर्व मूळ अमेरिकन लोकांना नागरिकत्व दिले.

१९१०: चार्ल्स रोल्स - विमानाने इंग्रजी चॅनेल न थांबता २ वेळा पार करणारे पहिले व्यक्ती आहेत.

आज यांचा जन्म

१९८७: सोनाक्षी सिन्हा - भारतीय अभिनेत्री

१९७४: गाटा काम्स्की - अमेरिकन बुद्धीबळपटू

१९६५: मार्क वॉ - ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू

१९६५: स्टीव्ह वॉ - ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू

१९६३: आनंद अभ्यंकर - अभिनेते (निधन: २३ डिसेंबर २०१२)

१९५५: नंदन निलेकणी - इन्फोसिसचे सहसंस्थापक - पद्म भूषण

१९५५: मणि रत्नम - चित्रपट दिग्दर्शक - पद्मश्री

१९४३: इलय्या राजा - भारतीय संगीतकार

१९३६: जमशेद जीजी इराणी - भारतीय पोलाद उद्योगपती, टाटा स्टीलचे संचालक - पद्म भूषण (निधन: ३१ ऑक्टोबर २०२२)

१९३०: पीट कॉनराड - अमेरिकन अंतराळवीर

१९०७: विष्णू विनायक बोकील - मराठी नाटककार आणि लेखक

१७३१: मार्था वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पत्नी (निधन: २२ मे १८०२)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: भजन सोपोरी - भारतीय संतूर वादक

२०१४: अंजन दास - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: १७ नोव्हेंबर १९४९)

२०१४: दुर्यसामी सायमन लौरडुसामी - भारतीय कार्डिनल (जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)

१९९०: श्रीराम शर्मा - भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते (जन्म: २० सप्टेंबर १९११)

१९९०: सर रेक्स हॅरिसन - हॉलिवूड अभिनेते (जन्म: ५ मार्च १९०८)

१९८८: राज कपूर - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १४ डिसेंबर १९२४)

१९८७: अँथनी डी मेलो - भारतीय-अमेरिकन धर्मगुरू आणि मानसोपचारतज्ज्ञ (जन्म: ४ सप्टेंबर १९३१)

१९७५: देवेन्द्र मोहन बोस - वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (जन्म: २६ नोव्हेंबर १८८५)

१९७०: ब्रुस मॅक्लारेन - मॅक्लारेन रेसिंग टीमचे संस्थापक (जन्म: ३० ऑगस्ट १९३७)

१८८२: ज्युसेप्पे गॅरिबाल्डी - इटलीचा क्रांतिकारी (जन्म: ४ जुलै १८०७)

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा