लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात काय?

Published by : Team Lokshahi

महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात काय?

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर आता महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भाजपचा जाहीरनामा प्रकाशित

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात येत आहे.

धनंजय महाडिकांची लाडक्या बहिणींना दमदाटी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेल्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये जर तुम्हाला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा त्यानंतर आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो, असे वक्तव्य करणारे भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे आता त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे कचाट्यात सापडलेत.

शिवसेनेच्या उमेदवारांसाठी अभिनेता गोविंदा मैदानात

शिवसेना (शिंदे) नांदेड उत्तर विधानसभेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारार्थ सिनेअभिनेते तथा शिवसेनेचे नेते गोविंदा यांचा नांदेड शहरात रोड शो.नांदेड शहरातील शिवाजी नगर ते भक्ती लॉन्स पर्यंत रोडशो

सोलापुरात भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का!

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. मोची समाजातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलायं. सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मोची समाजाला उमेदवारी न दिल्याने प्रवेश केलाय.

साताऱ्यात आज शिवेंद्रराजे भोसले यांची सभा

साताऱ्यातील कुडाळमध्ये आज शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय. तसंच भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.

सांगोल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

सांगोल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. सांगोल्यात उद्धव ठाकरेंची भव्य प्रचार सभा पार पडमार आहे. दुपारी 2 वा. उद्धव ठाकरेंची जाहीर सभा.

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result