Lokshahi marathi news live updates 
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

'लाडकी बहिण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट', भाजपचे ट्वीट

Team Lokshahi

महायुतीत रिसोड मतदारसंघावरून पेच कायम

महायुतीमध्ये रिसोड मतदारसंघावरून पेच कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु आहे. भाजपकडून दोघे तर शिवसेनेकडून एक जण इच्छुक आहे. भाजपकडून अनंतराव देशमुख, विजय जाधवांचा दावा आहे. शिवसेनेकडून भावना गवळी उमेदवारीसाठी आग्रही आहेत. रिसोड मतदारसंघाचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे.

'लाडकी बहिण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट', भाजपचे ट्वीट

'लाडकी बहिण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट' असल्याचे भाजपकडून ट्विट करत काँग्रेसवर हल्लाबोल करण्यात आला. भाऊबीजचा संदर्भ देत भाजपने महिला मतदारांना साद घातली आहे.

वर्षभरात अमेरिकेत 90 हजार बेकायदेशीर प्रवेश केलेल्या भारतीयांना अटक

वर्षभरात अमेरिकेत 90 हजार भारतीयांना अटक केली. बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून अटकेत असलेल्या लोकांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक गुजराती असल्याची माहिती आहे.

पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का

पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. पुणे शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांचा पक्षाचा राजीनामा केलायं. राजीनामा देण्याची कारणे नमूद करून पक्षाच्या सचिवांना पत्र पाठवले आहे.

भाजप नेते सत्यजित कदम शिवसेनेच्या वाटेवर?

भाजप नेते सत्यजित कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. सत्यजित कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा 30 तारखेला प्रसिद्ध होणार

काँग्रेसचा जाहीरनामा 30 तारखेला प्रसिद्ध होणार असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा सर्वाना न्याय देणारा असणार असल्याचे ही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; नऊ प्रवासी जखमी

वांद्रे टर्मिनसवर मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरी

वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्रमांक १वर चेंगराचेंगरी

चेंगराचेंगरी दुर्घटनेत ९ जण जखमी

जखमींवर भाभा रुग्णालयाच उपचार सुरु

वांद्रे-गोरखपुर एक्सप्रेस पकडण्यासाठी झाली होती गर्दी

जखमींमध्ये २ जण गंभीर

देवेंद्र भुयार यांचं महायुतीतून पत्ता कट?

महायुतीतून आमदार देवेंद्र भुयार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

वरुड-मोर्शी मतदारसंघातून आमदार देवेंद्र भुयार पुन्हा लढवतील अपक्ष निवडणूक आमदार देवेंद्र भुयार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जोरदार झटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून देवेंद्र भुयार यांची ओळख.

अंधेरी पश्चिमधून उमेदवारी दिल्यानं सचिन सावंत नाराज

काँग्रेस नेते सचिन सावंत वांद्रे पूर्वमधून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, सचिन सावतांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मतदार संघ बदलून देण्याची सावतांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.

इस्रायलकडून इराणच्या लष्करी तळांवर जोरदार हवाई हल्ले

इस्रायलकडून इराणच्या लष्करी तळांवर जोरदार हवाई हल्ले करण्यात आले होते. हल्ल्यामध्ये इराणचे दोन सैनिक ठार झाले आहेत. हिजबुल्लाकडूनही इस्रायलला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. इराण-इस्रायल हल्ल्यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे.

कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने

कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने लढत पाहायला मिळणार आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर लढणार आहेत.

कोल्हापूर काँग्रेसच्या शहर कार्यालयावर मध्यरात्री दगडफेक

कोल्हापूर काँग्रेसच्या शहर कार्यालयावर मध्यरात्री दगडफेक करण्यात आली. 'चव्हाण पॅटर्न' लिहत अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. कोल्हापूर उत्तरच्या तिकिटाच्या वादातून घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यात सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

पुण्यात सकल ब्राह्मण समाजाने महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. महायुतीने ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व दिल्याने निर्णय घेण्यात आला आहे. सकल ब्राह्मण संघटनेनं पाठिंब्याचं पत्र जाहीर केलं आहे.

Skin Care : दिवसातून कितीवेळा चेहरा धुवावा? असा निवडा योग्य फेसवॉश

वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; नऊ प्रवासी जखमी; दोन जण गंभीर

यंदाच्या दिवाळीत बाजारातील तयार फराळाला अधिक मागणी

'राजकारणातील टरबूज्या...' अनिल देशमुखांचा फडणवीसांवर निशाणा

दिवाळीत फटाक्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ