लोकशाही लाईव्ह ब्लॉग

देवेंद्र फडणवीस सोडवणार मुंबईतील जागांचा पेच?

Team Lokshahi

माढ्यातून महायुतीने धनगर समाजाला उमेदवारी द्यावी; राष्ट्रवादीचे नेते संजय हाके पाटील‌ यांची मागणी

माढ्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नाही. अशातच धनगर समाज उमेदवारीसाठी आक्रमक झाला आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून महायुतीने धनगर समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय हाके पाटील‌ यांनी केली आहे.

महायुतीमध्ये माढ्याची जागा अजित पवार गटाकडे आहे. महाविकास आघाडीने सोलापूर जिल्ह्यात तीन मतदार संघात धनगर समाजाला उमेदवारी दिली आहे. महायुतीने माढ्यात धनगर समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. उमेदवारीचा तिढा आणखी वाढला आहे.

देवेंद्र फडणवीस सोडवणार मुंबईतील जागांचा पेच?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील जागांचा पेच सोडवणार असल्याचे बोललं जात आहे. बोरिवली, वर्सोवा, घाटकोपरच्या जागांवर उमेदवार बदलणार? का असा सवाल विचारला जात आहे. शिवडी, चेंबूर, विक्रोळी, भांडुपच्या जागांवर वाद कायम आहे. भाजपकडून शिवसेनेला उमेदवार देण्याबाबत खलबतं सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

कारखानदारांचा माज उतरवणार, राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूरच्या जयसिंगपुरात 23 वी स्वाभिमानीची ऊस परिषद पार पडली. "कारखानदारांचा माज उतरवणार" असा इशारा परिषदेमध्ये राजू शेट्टी यांनी दिला आहे. 'FRPसह एकरकमी 3,700 रुपये पहिली उचल द्या' अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती जाहीर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या नावावर एकूण 5.2 कोटींची संपत्ती आहे. संपत्तीमध्ये शेतजमीन आणि निवासी मालमत्तेचाही समावेश आहे. अमृता फडणवीसांच्या नावावर 7.9 कोटींच्या संपत्तीची नोंद आहे.

CECच्या बैठकीत राहुल गांधींची नाराजी- सूत्र

काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत राहुल गांधी नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेस जागावाटपात कमी पडल्याची खंत व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसची आक्रमकता कमी पडल्याचं राहुल गांधींनी वक्तव्य केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जागावाटपात काँग्रेसला 100 आकडाही गाठता आला नसल्याबाबत राहुल गांधी नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंची भेट घेणार

मविआतील जागावाटपाचा तिढा सुटणार का याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात मेरिटवर काँग्रेसवर जास्त जागा मिळायला हवी होती. मेरिटच्या आधारावर जास्त जागा मिळाव्या असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. तर बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी सुजीत कुमारला पंजाबच्या लुधीयानामधून अटक करण्यात आली आहे.

चेंबूरमध्ये भरारी पथकाकडून लाखोंची रक्कम जप्त

चेंबूरमध्ये भरारी पथकाने लक्षावधी रूपयांची रक्कम जप्त केली आहे. रोख रकमेसह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आचारसंहितेदरम्यान भरारी पथकाची ही मोठी कारवाई आहे. कार घाटकोपरवरुन चेंबूरला जात असताना ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Mns Candidate List 2024: मनसेची चौथी यादी जाहीर झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आता मनसेची चौथी यादी जाहीर झाली आहे. 5 उमेदवारांच्या नावासह ही मनसेची चौथी यादी समोर आली आहे. यात अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. कसबा पेठेतून गणेश भोकरे तर कलीना मधून बाळकृष्ण हुटगी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

"...तोपर्यंत फॉर्म भरु नका," बावनकुळे यांची उमेदवारांना तंबी

केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यादी जाहीर करत नाही तोपर्यंत फॉर्म भरु नका. नाव जाहीर होण्याआधी फॉर्म भरण्यास मनाई असल्याची सूचना उमेदवारांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुनळे यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीतून देवराव होळी यांनी अर्ज भरल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सूचना दिल्या आहेत.

महायुतीतील 10 जागांच्या तिढ्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

महायुतीतील त्या 10 जागांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. 'महायुतीत 10 जागांचा तिढा समन्वयाने सुटेल' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच महायुतीचा स्ट्राईक रेट केलेल्या कामांवर ठरेल. पूर्ण बहुमताने महायुतीचं सरकार येईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

अबू आझमी यांचा मविआ नेत्यांना इशारा

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मविआ नेत्यांची आज भेट घेतली आहे. समाजवादी पक्षाला 5 जागा देण्याची मागणी आझमी यांनी केली आहे. तसेच 5 जागा न दिल्यास 25 जागा लढण्याचा इशारा ही त्यांनी यावेळी दिला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर 10 कोटींची चांदी जप्त

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खालापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 10 कोटींची चांदी जप्त करण्यात आली आहे. पिकअप टेम्पोमधून चांदीची वाहतूक करण्यात येत होती. जप्त केलेल्या मुद्देमालात चांदीच्या वस्तू-विटांचा समावेश आहे.

दिल्लीमध्ये काँग्रेस निवडणूक समितीची बैठक सुरु

दिल्लीत मल्लिकार्जून खर्गे यांच्या घरी निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, केसी वेणुगोपाल यांच्यासह महाराष्ट्रातले सर्व दिग्गज काँग्रेस नेते हजर आहेत.

मिलिंद देवरा वरळीतून निवडणूक लढणार

मिलिंद देवरा वरळीतून लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या संदर्भात मिलिंद देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा लढत पाहायला मिळणार आहे.

सुहास कांदे छगन भुजबळांविरोधात लढणार?

शिवसेना नेते सुहास कांदे यांचा भुजबळांविरोधात लढण्याचा इरादा असल्याचे सध्या चित्र तयार झाले आहे. येवल्यामध्ये भुजबळ वि. कांदे रंगत लढणार असे चित्र तयार झाले आहे. नांदगावात समीर भुजबळ अपक्ष उभे राहिल्याने येवल्यातून सुहास कांदे छगन भुजबळांविरोधात रिंगणात? उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

प्रताप सरनाईकांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला आहे. मागच्या वेळीपेक्षा जास्त लीडने सरनाईक निवडून येतील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन ही करण्यात आलं.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी