लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Congress Candidate 3nd List: कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर, या नावांची घोषणा

shweta walge

Congress Candidate 3nd List: कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर, या नावांची घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून 16 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रमधून सचिन सावंताना उमेदवारी जाहीर.

बालाजी खतगावकरांकडून उमेदवारीचे संकेत

नांदेडच्या मुखेड मध्ये महायुतीत मोठी रस्सीखेच पहावयास मिळत आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत नांदेडच्या मुखेड विधानसभा मतदार संघातून आमदार डॉ तुषार राठोड यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे मुखेड मध्ये महायुतीत मिठाचा खडा पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर हे मागील एका वर्षांपासून मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करीत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खतगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश देखील केला.शिंदे गटाला मुखेडची जागा सुटेल असे चित्र असताना भाजपाने आमदार डॉ तुषार राठोड यांना पुन्हा संधी दिली.आणि इथेच महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. परंतु बालाजी पाटील खतगावकर यांनी अजूनही अशा सोडली नाहीय.येणाऱ्या दोन दिवसात महायुतीचे वरिष्ठ नेते माझा विचार करतील आणि मला आशीर्वाद देतील असा विश्वास खतगावकर यांनी व्यक्त केला. मुखेडच्या जनतेचा मला पाठिंबा आहे.त्यामुळे ही निवडणूक मला कोणत्याही परिस्थितीत लढवावी लागेल नाही तर मुखेडची जनता मला माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया बालाजी पाटील खतगावकर यांनी दिली.

Baba Siddique Case;बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी हरीशची 28 ऑक्टोबरपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत रवानगी

बाबा सिद्दीक हत्या प्रकरणातील सर्व 9 आरोपींना आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर मुंबईतील एस्प्लानेड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी हरीशला 28 ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत तर उर्वरित आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने आरोपी शूटर गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अखेर किशोर जोरगेवार यांचा उद्या भाजप प्रवेश

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा अखेर उद्या भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. चंद्रपूर शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात हा सोहळा सकाळी अकरा वाजता होणार असून यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. जोरगेवार यांच्या भाजप उमेदवारीला मुनगंटीवार यांनी जोरदार विरोध केला होता. मात्र पक्षनेतृत्वाने त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने मुनगंटीवारांचा नाईलाज झाला. त्यामुळे चंद्रपूरची उमेदवारीही त्यांनाच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या काही दिवसांपासून जोरगेवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात होते.

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेंट्रल मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल वाशीदरम्यान ब्लॉक असणार आहे.

मनसेची पाचवी यादी जाहीर; 15 उमेदवारांची घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पनवेलमधून योगेश चिलेंना संधी तर काटोलमधून सागर दुधानेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या पख्तुनख्वा प्रातांत आत्मघाती हल्ला

पाकिस्तानच्या पख्तुनख्वा प्रातांत आत्मघाती हल्ला झाला आहे. 6 सुरक्षा जवानांसह 8 जण हल्ल्यात ठार झाले आहेत. पोलीस चौकीला लक्ष्य करून आत्मघाती हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या आदिवासी जिल्ह्यातील अस्लम चेक पोस्टवर आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे.

आम्हाला सत्तेत बसवा, मराठा आरक्षणावर तोडगा काढून दाखवतो : संभाजीराजे

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्याची महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडीला पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्तीची स्थापना करण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्ती सत्तेत आल्यास त्यांचे महाराष्ट्राच्या विकासासाठी काय व्हिजन असेल यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आज लोकशाही वाहिनीच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.

भाजपची दुसरी यादी जाहीर

भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. देवयानी फरांदे, हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढणार नाही

आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढणार नसल्याची माहिती आपचे नेते संजय सिंह यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात मविआच्या प्रचारासाठी येणार आहेत. विलेपार्ले किंवा मलबार हिल विधानसभा आप लढण्याची शक्यता होती. मात्र त्या दोन्ही जागा ठाकरेंची शिवसेना लढणार आहे.

महायुतीत भाजपच मोठा भाऊ?

विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? महायुतीत भाजपच मोठा भाऊ?

भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढणार- सूत्र

भाजपकडून पुन्हा एकदा 9 आकड्याचे गणित जुळणार

विश्वसनीय सूत्रांची माहिती

ठाकरेंच्या शिवसेनेची तिसरी यादी ठरली?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तिसरी यादी तयार असल्याच्या चर्चा आहेत. वर्सोवामधून हारुन खान यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. तर विलेपार्लेमधून संदीप नाईकांना उमेदवारी देण्यात येणार आहे. घाटकोपर पश्चिममधून संजय भालेरावांना उमेदवारी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दर्यापूरमधून गजानन लवटेंना AB फॉर्म दिल्याची माहिती मिळत आहे.

भारतानं सलग दुसरी कसोटी मालिका टेस्ट मॅच गमावली

भारतीय संघाने 12 वर्षानंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा दारुण पराभव झाला आहे. 245 धावांमध्ये भारताचा डाव आटोपला आहे. याआधी भारताने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका गमावली होती.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर करणयात आली आहे. या यादीतून 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी शनिवारी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून अधिकृत घोषणा केली आहे. पूर्वीचे ४५ आणि शनिवारचे २२ अशी ६७ नावांची यादी जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.

पालघरच्या बोईसर-तारापूर एमआयडीसीतील कंपनीत मोठा स्फोट

बोईसर तारापूर एमआयडीसीतील धार्मित रिसायकलिंग इंडस्ट्रीज या कंपनीत ब्लास्ट . ब्लास्ट मध्ये तीन कामगार गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी. बोईसर तारापूर एमआयडीसीतील ही प्लॉट नंबर जी 44 या कंपनीत ब्लास्ट . उत्पादन सुरू असताना ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती . जखमींवर बोईसरच्या तुंगा रुग्णालयात उपचार सुरू. पोलीस प्रशासनासह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

विदर्भात बच्चू कडूंना भाजपचा मोठा धक्का

विदर्भात बच्चू कडू यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश पार पडला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अनिल गावंडे यांनी प्रवेश केला आहे.

मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सर्व पक्षाकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित पानसे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी