हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी १० वाजता महत्वाची बैठक होणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात बैठक होणार आहे. हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे घेऊन आक्रमक व्हायचं आणि विरोधी पक्षाची काय रणनीती असावी यावर चर्चा होणार आहे.
मुंबईतील मतदारांच्या नाराजीत घट झाली आहे. मुंबईत नोटाला 70 हजार मतं मिळाली आहेत. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत नोटाला कमी मतं मिळाली. मुंबईत 1.24 टक्के लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.
मुंबईत उद्या मनसेची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासस्थानी बैठक घेण्यात येणार आहे. मनसेची पुढील भूमिका काय असणार याकडे लक्ष वेधलं आहे.
'एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं', मंत्री उदय सामंत यांनी LOKशाहीवर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सीएम व्हावेत शिवसैनिक म्हणून इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हिंगोलीच्या कळमनुरीचे विधानसभेचे संतोष बांगर 31 हजार मतांनी विजयी झाल्यानंतर हिंगोली शहरामध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. हिंगोली शहरातील गांधी चौकात संतोष बांगर यांच्या समर्थकांनी भावी मंत्री म्हणून बॅनर लावले आहेत.
धुक्याच्या जाड थराने राष्ट्रीय राजधानी झाकली आहे. कारण अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 'अतिशय खराब' श्रेणीत राहिला आहे. जुन्या गाड्यांमुळे जास्त प्रदूषण होते. त्यामुळे त्या गाड्यांच्या वापरावर मर्यादा आणल्या पाहिजेत. क्रीडापटूंनाही श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते नितेश राणेंचा गौरव केला आहे. भगवी शाल घालत राणेंचे फडणवीसांनी कौतुक केलं आहे. नितेश राणेंकडून फडणवीसांचे भगवी शाल घालत अभिनंदन करण्यात आलं. राणेंच्या कामाचे कौतुक करताना फडणवीसांनी तीच भगवी शाल राणेंच्या खांद्यावर ठेवली.
शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता होणार पत्रकार परिषद होणार आहे. मविआच्या पराभवानंतर पत्रकार परिषद होत आहे. शरद पवार पराभवावर काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. विधानसभेत डावललेल्या नाराजांना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याची माहिती आहे.
आमदार झालो हे अजूनही मला पटत नाही पण लोकांनी मला आमदार केलं.. मला माझ्या कष्टाचा फळ मिळालं. तसेच राज्याच्या हितासाठी जे प्रश्न मला विधानसभेत मांडायचे ते मी मांडणार असेही रोहित पाटील यांनी सांगितले.
ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी साडेबारा वाजता सर्व नवीन आमदारांची बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीत निवडणुकीच्या निकालावर चर्चा होणार आहे. तसेच पक्षाचे पुढील धोरण आणि नीती ठरवण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चेसाठी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती लागला आहे. मंत्रिपदाचा 21-12-10 चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. भाजपला 21, शिवसेनेला 12, राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. फॉर्मुल्यावर दिल्लीच्या वरिष्ट नेत्यांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. तिन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना विक्रमी मतदान मिळाले आहे. सुरेश भुरे यांनी 1 लाख 50 हजार 198 मत घेऊन नवा विक्रम केला असून मतदार राजा व जळगाव शहरातील सर्वांचे सुरेश भोळे यांनी आभार मानले आहे. जळगाव शहरातील विकास कामे पूर्ण करणार व एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे वाढवून युवकांना रोजगार देणार