Lokshahi Marathi LIVE Blog 
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या बसस्थानकात दिली भेट,नागरिकांशी साधला संवाद

Team Lokshahi

18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान शाळांना सुट्टी देण्याची शक्यता

18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान शाळांना सुट्टी देण्याची शक्यता वर्तवली जातेय. राज्यातील शिक्षक हे निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.

चित्रा वाघ यांचं ट्वीट करत संजय राऊत यांना प्रत्युत्तर

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जनाब संजय राऊत….@rautsanjay61

छे ….ही निवडणूक श्री एकनाथ शिंदे श्री देवेंद्र फडणवीस, श्री अजित पवार विरुद्ध

شرد پوار، راہول گاندھی، ادھو ٹھاکرے۔ अशी आहे..

विषय खत्म !

असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलंय.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई

येवल्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. एका वाहनातून 41 लाखांची रोकड आणि दुसऱ्या वाहनात 1 लाख 92 हजार 880 रुपयांची रोकड केली जप्त करण्यात आली आहे. पैसे कोणाचे होते आणि कुठे जात होते याचा पोलीस तपास करत आहे

राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या बसस्थानकात दिली भेट,नागरिकांशी साधला संवाद

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज त्यांची नांदेड येथे प्रचार सभा पार पडली.प्रचार सभा पार पडल्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकात जाऊन नागरिकांची भेट घेतली .बस्थानाकात ऊसाचा रस पीत राहुल गांधी यांनी नागरिकांसोबत चर्चा केली. राहुल गांधी यांच्या अचानक बसस्थानानक भेटी नंतर सुरक्षा यंत्रनेची मोठी धावपळ उडाली.

नवी मुंबईतील सभेत पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर जोरदार टीका

रासप उमेदवार सावित्री चकोर चांगल्याच संतापल्या

परभणी विधानसभा मतदारसंघातील रासप उमेदवार सावित्री चकोर यांच्या बद्दल त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून काही चुकीच्या अफवा पसरविला जात असल्याने चकोर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर कार्यकर्त्यांवर चांगल्याच संतापल्या. दोन्ही सेनेच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून चुकीच्या बातम्या थांबल्या नाही तर त्यांच्या कार्यक्रम लावते .असा धमकी वजा इशारा सावित्री चकोर यांनी दिला असल्याचा व्हिडीओ शोषल मीडियावर जोरदार वायरल झाला.

मंगळवेढा येथे नितिन गडकरी यांच्या बॅगांची तपासणी

मंगळवेढा येथे नितिन गडकरी यांच्या बॅगांची तपासणी केली. पंढरपूर येथील भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी गडकरी आले असता हेलीपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी तपासणी केली.

त्र्यंबकेश्वर येथील महाविकास आघाडीच्या सभेचा मंडप कोसळला

त्र्यंबकेश्वर येथील महाविकास आघाडीच्या सभेचा मंडप कोसळला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जुन खर्गे या ठिकाणी उपस्थित होते. गर्दी कमी असल्यामुळे कोणालाही दुखापत नाही. मंडप कोसळल्यामुळे सभेमध्ये असलेल्या नागरिकांची धावपळ झाली. जोरदार हवा सुरू असल्यामुळे मंडप कोसळल्याची माहिती मिळत आहे.

राहुरी मतदारसंघात प्रसाद तनपुरेंची कार्यकर्त्याला धमकी

राहुरी मतदारसंघात प्रसाद तनपुरेंची कार्यकर्त्याला धमकी देण्यात आली आहे. उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार करा. तनपुरेंच्या विरोधात विरोधात गेला तर पुढचा विचार करा. अण्णासाहेब बाचकर या कार्यकर्त्याला धमकी देण्यात आली आहे. तनपूरेंनी कार्यकर्त्याला फोनवरुन धमकी दिली आहे. धमकी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन झाले आहे. सलग तीन वेळा खासदार होते. ग्रामपंचायत सदस्य ते खासदार अशी पद भूषविली होती. आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू उपचार होते. नाशिक राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. वाजपेयी सरकार स्थापनेवेळी चव्हाण उपचार सुरू असताना रुग्णालयातून संसदेत गेले होते.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बॅगांची कराडमध्ये तपासणी

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आले होते. आज ते पुण्याला जाताना त्यांच्या बॅगांची तपासणी कराड विमानतळावर करण्यात आली. कराड विमानतळावर सर्वच राजकीय नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

श्रीनगरमधील कुर्सू राजबाग येथील मुस्लिम पब्लिक स्कूलमध्ये आग

श्रीनगरमधील कुर्सु राजबाग भागातील मुस्लिम पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी दुपारी आग लागली. शाळेला लागलेल्या आगीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेकडो शाळकरी मुलांची सुटका झाली. आगीचे कारण समजू शकले नाही. मुस्लिम पब्लिक स्कूलला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी

आदित्य ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांचं दापोलीत आगमन झालं आहे. हेलिपॅडवर आदित्य ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमधील बॅग सेक्शनचीही तपासणी करण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे.

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान