Lokshahi live 
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: केज पोलिसांकडून 56 लाखांचा गांजा जप्त

Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज दोन ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. दुपारी 12 वाजता अकोला तर दुपारी 2 वाजता नांदेडमध्ये सभा होणार आहेत.

रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या बीड जिल्ह्यात तीन जाहीर सभा

शरद पवार यांच्या बीड जिल्ह्यात तीन जाहीर सभा होणार आहेत. बीड, परळी आणि केज या तीन विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या सभा होणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात सभा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात 6 ठिकाणी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली दौऱ्यावर असून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निशिकांत पाटील यांच्यासाठी दुपारी 1 वाजता आष्टा येथे प्रचार सभा होणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज विदर्भ दौऱ्यावर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज विदर्भ दौऱ्यावर असून दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

चंद्रपूरात भाजप उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचार सभेसाठी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर

चंद्रपूरात भाजप उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचार सभेसाठी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. शहरातील कोहिनुर ग्राऊंड इथे सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांची सोलापुरात जाहीर सभा

प्रकाश आंबेडकर यांची आज सोलापुरात जाहीर सभा होणार आहे.

उद्धव ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर

उद्धव ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोली विधानसभेच्या उमेदवार रुपाली पाटील गोरेगावकर आणि कळमनूरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ संतोष कौतिक टारफे यांच्या प्रचारार्थ सभा आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मनसेने उमरखेड येथे राजेंद्र नजरधने यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारसभेसाठी राज ठाकरे आज सकाळी 11 वाजता उमरखेड येथे सभा घेणार आहेत.

रायगड - मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरती खाजगी बसला भीषण अपघात

रायगड - मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वरती खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले असून 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. खोपोली जवळ पहाटे 4 वाजता ही घटना घडली.

आदित्य ठाकरे यांचा आज वरळीत प्रचार दौरा

आदित्य ठाकरे यांचा आज वरळीत प्रचार दौरा होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत आदित्य ठाकरे प्रचार करणार असून नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

अंबरनाथमध्ये गांजा विकणाऱ्या महिलेला अटक

अंबरनाथमध्ये गांजा विकणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. 51 हजारांचा अडीच किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

झारखंड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या रांची येथील स्वीय सचिवांच्या घरावर छापा

झारखंड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या रांची येथील स्वीय सचिवांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सुनील श्रीवास्तव यांच्या निवासस्थानाची कसून झडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली.

महाविकास आघाडीचा विधानसभेसाठीचा सविस्तर जाहीरनामा उद्या जाहीर होणार

महाविकास आघाडीचा विधानसभेसाठीचा सविस्तर जाहीरनामा उद्या जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत.

पुण्यात आयकर विभागाची मोठी छापेमारी

पुण्यात आयकर विभागाची मोठी छापेमारी. सुभाष लोढा यांच्या कार्यालय आणि घरावर छापेमारी करण्यात आली आहे. सुभाष लोढा यांच्याकडे मोठं घबाड सापडलं असल्याची माहिती मिळत आहे.

दिल्लीची हवा पुन्हा खराब

दिल्लीची हवा पुन्हा खराब. अनेक भागात प्रदूषणाची पातळी गंभीर झाली आहे.

पाकिस्तानात रेल्वे स्टेशनवर शक्तीशाली बॉम्ब स्फोट

पाकिस्तानात क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. स्फोटात अनेकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

किराणा दुकानात गांजा आणि दारूची विक्री

नवी मुंबईच्या रबाळे MIDC परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किराणा दुकानात गांजा आणि दारूची विक्रीचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून 1लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात 5 आरोपी अटकेत असून तिघे फरार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अपघात झाला आहे. अपघातामुळे परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. तीन ते चार किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

बांगलादेशी आणि रोहिंग्यांची मुंबईत लोकसंख्या वाढ

बांगलादेशी आणि रोहिंग्यांची मुंबईत लोकसंख्या वाढ झाली आहे. टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अभ्यासातील निष्कर्ष समोर आला आहे. मुंबईत 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54 टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोवंडी, मानखुर्द, धारावी आणि कुर्ल्यातील झोपडपट्टीत रोहिंग्या स्थलांतरित झाले आहेत. मुंबईत मोठ्या संख्येने बांगलादेशी व रोहिंग्या स्थलांतरित झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अपघात झाला आहे. अपघातामुळे परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली असून तीन ते चार किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

केज पोलिसांकडून 56 लाखांचा गांजा जप्त

बीडच्या केज तालुक्यातील बनसारोळा येथे पोलिसांनी तब्बल 56 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. एका सरकारी गायरान जमिनीवर अज्ञात इसमाने गांजाची लागवड केली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच या ठिकाणी छापा टाकून 550 किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

राहुल गांधी यांची आज नांदेडमध्ये सभा

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची आज नांदेडमध्ये सभा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी सभा

मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा रिंगणात

Rahul Narwekar: कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर रिंगणात