लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून

Team Lokshahi

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा झाली आहे. अधिवेशन 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत पार पडणार आहे. संसदीय कार्यमंत्री किरण रिजूजी यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. तर महाराष्ट्रात एकाच दिवशी योगी आदित्यनाथ घेणार तीन सभा घेणार आहे. वाशीम, मूर्तझापुर, मोझरी - तिवसा येथे योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

'माझी लढाई ही दिल्लीच्या तक्ता विरोधात; कारण...' सुप्रिया सुळे

माझी लढाई ही दिल्लीच्या तक्ता विरोधात लढाई आहे. कारण दिल्लीच्या तक्त हा महाराष्ट्राचे सातत्याने अपमान करतो. त्या तक्ताच्या विरोधात माझी लढाई आहे. दिल्लीत एक अदृश्य शक्ती आहे त्याच्या विरोधात ही लढाई आहे.असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या सांगलीच्या पलूस तालुक्यातील औदुंबर येथे विश्वजीत कदम यांच्या प्रचार समारंभा प्रसंगी बोलत होत्या.

कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

उद्धव ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे यांनी कोल्हापुरातल्या उजळाईवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे दहाही उमेदवार उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचं कौतुक करत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलीय. तसेच मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामाला लागावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटले

मविआच्या बड्या नेत्यांची उद्या बीकेसीत जाहीर सभा

महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची उद्या मुंबईत बिकेसी येथे जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी खासदार वर्षा गायकवाड, आमदार अनिल परब दाखल झाले आहेत. बीकेसीत होणाऱ्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे.

पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते-मुख्यमंत्री शिंदे

कोणीही मायका लाड आला तरी लडकी बहीण योजना बंद करू शकत नाही. पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते. मला एक सखी बहीण आहे आता मला अडीच कोटी बहिणी आहेत. मला माझा लाडक्या बहिणीला लखपती बनवायची आहे-मुख्यमंत्री शिंदे

Share Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह नोव्हेंबर सिरिजची सुरुवात

व्यवहारात सेन्सेक्स 66.57 अंकांनी घसरुन 78,667 वर व्यवहार करत होता तर निफ्टीही सुमारे 70 अंकांनी घसरत 23,950 च्या आसपास व्यवहार करत होता. मात्र, त्यानंतर निफ्टीही हिरव्या रंगात दिसला. बँक निफ्टी जवळपास 80 अंकांनी घसरला होता. मिडकॅप निर्देशांकही घसरत होता. कालच्या मोठ्या घसरणीनंतर निफ्टीवरील बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात दिसले. मेटल निर्देशांकात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. तर याचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्री, एचडीएफसी बॅंक आणि एम अॅण्ड एम यांच्यावर होत आहे यांच्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

बीड: जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात 238 जणांची माघार: 137 उमेदवार मैदानात कायम

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. वैध ठरलेल्या 377 उमेदवारांपैकी 238 उमेदवारांनी माघार घेतलीय. आता 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये 139 उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत.. गेवराई मतदार संघात 19, माजलगाव मतदार संघात 34, बीड 31, आष्टी 17 , केज 25, परळी 11 याप्रमाणे उमेदवारी अर्ज कायम असून 6 मतदार संघात एकूण 137 उमेदवार नशीब आजमावणार आहेत.. उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या उमेदवारांमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, परळीतून राजाभाऊ फड यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे.

Amount Seized From Bhiwandi: भिवंडीत एटीएम बँकेत तब्बल दोन कोटी तीस लाखांची रोकड जप्त

Prakash Ambedkar On Jarange Patil: प्रकाश आंबेडकरांचं जरांगेंना आवाहन, म्हणाले...

मविआकडून लाडकी बहीण योजनेला काऊंटर करणारी घोषणा?

Anushka Sharma Post On Virat Kohli HBD: विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काची खास पोस्ट

Eknath Shinde | 'लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जायला तयार'; कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य