लोकशाही लाईव्ह ब्लॉग

धनुष्यबाण आणि शिवसेना नाव फक्त बाळासाहेब ठाकरेंची प्रोपर्टी- राज ठाकरे

Published by : Team Lokshahi

धनुष्य बाण आणि शिवसेना नाव फक्त बाळासाहेब ठाकरेंची प्रोपर्टी- राज ठाकरे

डोंबिवलीतून राज ठाकरेंच्या प्रचारा दरम्यान राज ठाकरेंकडून चिन्ह आणि पक्ष नावावरुन संतापजनक वक्तव्य. शिवसेना नाव आणि धनुष्य बाणाचे चिन्ह चे ना एकनाथ शिंदेंची प्रोपर्टी आहे, ना उद्धव ठाकरेंची प्रोपर्टी आहे, ती बाळासाहेब ठाकरेंच प्रोपर्टी आहे राज ठाकरे म्हणाले.

काल दिवाळी संपली आजपासून आमचे फटाके- राज ठाकरे

आज डोंबिवलीत मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार आणि अधिकृत उमेदवार राजू पाटील यांची प्रचार सभा पार पडत आहे. या प्रचार सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

'निवडणूक होईलपर्यंत रश्मी शुक्लांना कोणतीच जबाबदारी देऊ नका' नाना पटोलेंची मागणी

नाना पटोले यांचं निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र. निवडणूक होईपर्यंत रश्मी शुक्लांना कोणतीच जबाबदारी देऊ नका अशी मागणी या पत्रातूनआयोगाकडे केली आहे.

जळगावात 11 विधानसभा मतदारसंघात 92 उमेदवारांची माघार

जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 231 उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले होते दरम्यान उमेदवारी माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी 92 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज हे मागे घेतले असून 139 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत यात सर्वाधिक 29 उमेदवार हे जळगाव शहर मतदार संघात आपलं नशीब आजमावणार आहेत.

Election Commission : 'या' 3 राज्यात पोटनिवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या

उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी सांगितले की, तीन राज्यांतील 14 विधानसभा जागांसाठी आता 13 नोव्हेंबरऐवजी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरलाच निकाल लागेल.

उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, बस दरीत कोसळली, २५ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील अल्मोडा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. बस दरीत कोसळल्यामुळे अनेकांचा जीव गेलाय. ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये २५ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकं आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या बचावकार्य वेगाने सुरु आहे.अल्मोडामध्ये मार्चुला जवळ दरीमध्ये प्रवासी बस कोसळली.

बदलापूरच्या कात्रप परिसरात फ्लॅटला भीषण आग

बदलापूरच्या कात्रज करिसरात फ्लॅटला भीषण आग लागली होती. आगीत घराची बेडरूम संपूर्णपणे जळून खाक झाली असून, फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तसंच अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश मिळालंय.

हवाई दलाचं मिग-२९ फायटर जेट कोसळलं ! पायलटनं घेतली उडी; नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील आग्राजवळ मिग-२९ हे लढाऊ विमान कोसळले आहे. वैमानिक विमानातून बाहेर पडला आहे. विमानाने पंजाबमधील आदमपूर येथून उड्डाण केले होते आणि सरावासाठी आग्राला जात असताना ही घटना घडली. विमानातून पायलटनं बाहेर उडी घेतली. पण त्याची प्रकृती कशी आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.

मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार

आज (सोमवार) विधानसभा निवडणुकीची उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यासोबत त्यांनी समर्थकांना आपले अर्ज माघारी घेण्याचे आवाहन देखील यावेळी केले.

कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का

कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरुन सतेज पाटील नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान सतेज पाटील आणि शाहू महाराजांमध्ये वाद निर्माण होताना दिसून येत आहेत. खासदार शाहू छत्रपती महाराज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांच्यावरती देखील भडकले आहेत.

पुण्यात बंडखोराला माघार घेण्यात काँग्रेसला यश

पुण्यात बंडखोराला माघार घेण्यात काँग्रेसला यश. कसबा मतदारसंघात मुख्तार शेख यांची माघार. रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती.

चिंचवड विधानसभेतून नाना काटेंची माघार

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे बंडखोर नाना काटे यांनी माघार घेतली आहे. नाना काटेंचं हे बंड शमवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच भेट घेतली होती. तसेच, शरद पवारांनी देखील काटे यांच्यासोबत संवाद साधला होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघ त आता महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी थेट लढत होणार.

रायगड - अलिबाग मधून ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांची माघार

रायगड - अलिबाग मधून ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांची माघार. उध्दव ठाकरे यांच्या आदेशानंतर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

राजेभाऊ फड यांची अपक्ष उमेदवारी मागे

परळी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेभाऊ फड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजेभाऊ फड यांच्यात परळी मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार राजेभाऊ फड यांनी अर्ज मागे घेतला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेभाऊ फड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. परंतु या मतदारसंघात शरद पवारांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे बंडखोरी करत राजेभाऊ फड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु आज राजेभाऊ फड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

अक्षरा लहाने, नंदू वासनकरांचा अर्ज मागे

अचलपूर मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार प्रवीण तायडे विरुद्ध अक्षरा लहाने व नंदू वासनकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

मेळघाट मधून भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर तर तिवसा मधून भाजपच्या रविराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे..

तिवसाचे रविराज देशमुख यांना भाजपने प्रदेश उपाध्यक्ष करत उमेदवारी त्यांचा अर्ज मागे

खानापूर मतदार संघ हा महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला; ब्रह्मानंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज मागे

खानापूर मतदार संघातून भाजपाकडून बंडखोरी केलेले ब्रह्मानंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत ब्रह्मानंद पडळकर. खानापूर मतदार संघ हा महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गट सुहास बाबर,विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वैभव पाटील आणि शरद पवार गटाचे बंडखोर राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

दिंडोरीतून धनराज महाले यांची उमेदवारी मागे

दिंडोरीतून धनराज महाले यांची उमेदवारी मागे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर निर्णय घेतला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्यासमोर शिंदेंच्या शिवसेनेने धनराज महाले यांना एबी फॉर्म दिला होता.

परंडा विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या रणजीत पाटलांची माघार

परंडा विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या रणजीत पाटलांची माघार, महाविकास आघाडीतील तिढा सुटला. महाविकास आघाडीची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या रणजीत पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांच्यात लढत होणार.

बीड: केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांची माघार

भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली आहे. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संगीता ठोंबरे यांनी थेट भाजपाला आव्हान दिले आहे.

यवतमाळ मतदारसंघात बंडखोर संदीप बाजोरिया यांचे नामांकन मागे

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत नामांकन परत घेण्याचा साेमवार हा अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, पक्ष कार्यालयातून फोन आल्याने त्यांनी नामांकन परत घेत असल्याचे जाहीर केले. ते आता पुसद व कारंजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये मोठी उलथापालथ

कोल्हापूर उत्तरमध्ये मोठी उलथापलथ

मधुरिमाराजेंनी उमेदवारी घेतली मागे

कोल्हापूर उत्तरमध्ये लाटकरच काँग्रेसचे उमेदवार

मधुरिमाराजेंना दिलं होतं तिकीट

राज ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळे, आता सदा सरवणकर अमित ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवणार

सदा सरवणकर म्हणाले, मी महायुतीचा उमेदवार आहे आणि त्यामुळे महायुतीचे सर्व नेते हे महायुतेचे उमेदवार म्हणून मला पाठिंबा देतील. तर माहिमध्ये महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर, राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते गेले होते. मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारल्याचं सदा सरवणकर म्हणाले त्यामुळे मी निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सदा सरवणकर म्हणाले.

सदा सरवणकर घेणार राज ठाकरेंची भेट

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड