शायना एन सी विरोधात खासदार अरविंद सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांच्यावर शायना एन सी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल असलेल्या चिनाब ब्रिजबाबत गुप्तचर विभागाकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान चीनसोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यामध्ये भारतीय रेल्वेने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल उभारला होता. हा पूल चिनाब नदीवर असल्याने त्याला चिनाब ब्रिज असं नाव देण्यात आलं होतं. या ब्रिजमुळे रियासी जिल्ह्यातील स्थानिकांच्या दळणवळणाची मोठी सोय झाली. मात्र पाकिस्तान चीनसोबत जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
यवतमाळ : शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने व रात्रंदिवस एक करून शेतमाल पिकवला. शेतमाल विकण्याची वेळ आली असताना शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे. सोयाबीनची ३२०० ते ३५०० भाव देऊन खरेदी सुरु आहे. कापसाची एमएसची रू.७५८१ असतांनी शेतकऱ्यांना खेडा खरेदीनुसार ६२००/- ते ६४००भाव देवून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची लुट करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात काळी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी बेसन, भाकर, चटणी खाऊन दिवाळी साजरी केली.
महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शाह मैदानात उतरणार आहेत. अमित शाह यांची ९ नोव्हेंबरला मुंबईत सभा होणार आहे. मुंबईत भाजपकडून सभेची तयारी सुरु आहे. उद्धव ठाकरे व काँग्रेसपर निशाना साधण्याची शक्यता आहे.