लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मविआ नेत्यांची बैठक

Siddhi Naringrekar

बीडच्या परळीत मतदान केंद्रावर तोडफोड

बीडच्या परळीत मतदान केंद्रावर तोडफोड झाली. तोडफोड प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मविआ नेत्यांची बैठक

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मविआ नेत्यांची बैठक असून पुढील रणनीती ठरवण्यासाठी मविआ आज आणि उद्या दोन दिवस चर्चा करणार आहेत.

महाराष्ट्रात सरासरी 65.11 टक्के मतदान

महाराष्ट्रात सरासरी 65.11 टक्के मतदान झालं आहे. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 76.25 टक्के मतदान झालं आहे तर मुंबई शहरात सर्वात कमी 52.7 टक्के मतदान झालं आहे.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण 

अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून अदानी कंपनीचे शेअर 10 टक्क्यांनी घसरले आहेत.

रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या अभिनंदनाचे झळकले बॅनर

रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले असून माणगावमधील कार्यकर्त्यांनी निकाला आधीच अदिती तटकरेंचे अभिनंदन केले आहे.

बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग

बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

श्रीनगरमधील तापमान शून्याच्याखाली

श्रीनगरमधील तापमान शून्याच्याखाली गेलं असून श्रीनगर शहरात या मोसमात पहिल्यांदाच शून्याच्याखाली तापमानाची नोंद झाली आहे.

सातारा जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात

सातारा जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील किमान तापमान 11 अंशावर गेले असून वातावरणातील गारव्यामुळे महाबळेश्वर परिसरात धुक्याची चादर पसरली आहे.

दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर

दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर तर जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्ये देशातील आठ शहरांची नावं असून काही दिवसांपासून दिल्लीची हवा अति धोकादायक पातळीवर आहे.

सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन

सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले असून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

पुण्यातील पर्वती विधानसभेच्या उमेदवार अश्विनी कदम यांचे लागले विजयाचे बँनर

पुण्यातील पर्वती विधानसभेच्या उमेदवार अश्विनी कदम यांचे विजयाचे बँनर लागले आहेत. निकालाआधीच शुभेच्छा बँनर लावण्यात आले.

बीडच्या विडा गावात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी

बीडच्या विडा गावात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

अमरावतीत मतदान केंद्रावरुन ईव्हीएम पळविल्याचा आरोप

अमरावतीत मतदान केंद्रावरुन ईव्हीएम पळविल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमरावतीच्या गोपालनगर परिसरात ही घटना घडली आहे. मतदान केंद्रांवरून दुचाकीने ईव्हीएम पळविल्याचा आरोप करण्यात आला.

लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात काँटे की टक्कर

लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महायुतीला 128 - 142, महाविकास आघाडीला 125 - 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

अदानी समूहानं जारी केलं अमेरिकेतील आरोपांवर निवेदन

Latest Marathi News Updates live: मतदानात महिलांची टक्केवारी वाढली

CBSE Board Exam 2025: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Herbal Tea During Pregnancy: गरोदरपणातील हर्बल चहा ठरेल बाळ आणि बाळंतीणीच्या आरोग्यासाठी वरदान

शरीरातील नैसर्गिक वेग म्हणजे काय? जाणून घ्या वेगाचे 13 प्रकार