लोकशाही लाईव्ह ब्लॉग

शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप-मनोज जरांगे पाटील यांची भेट

Published by : Team Lokshahi

भांडुपमधील बुक डेपोला आग

भांडुपमधील बुक डेपोला आग

घटनास्थळी 3 अग्निशामक दलाच्या गाड्या आणि ॲम्बुलन्स दाखल

अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश

आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट

राज्यात 7 हजार 995 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात

राज्यात 7 हजार 995 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उभे आहेत. आतापर्यंत 10 हजार 905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप-मनोज जरांगे पाटील यांची भेट

भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही: आशिष शेलार

'भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नसल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. 'सना मलिक भाजपच्या उमेदवार असल्याचे आशिष शेलार यांनी वक्तव्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुणे दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुणे दौरा असणार आहेत. 8 किंवा 9 नोव्हेंबरला पुणे दौरा करतील. मोदी पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. महायुतीच्या सर्व 8 उमेदवारांसाठी एकत्रित सभा घेणार आहेत.

लेखिका वीणा देव यांचं निधन

लेखिका वीणा देव यांचं निधन झाले आहे. वीणा देव या गो. नी. दांडेकरांच्या कन्या होत्या. तसेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई आहेत.

Kasba vidhansabha | भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंनी भरला उमेदवारी अर्ज | Marathi News

राजस्थानात बसचा भीषण अपघात; 12 प्रवाशांचा मृत्यू, 24 जखमी

राजस्थानात बसचा भीषण अपघात

भरधाव बसची पुलाला जोरदार धडक

उड्डाण पुलावरुन बस कोसळली

अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू, 24 जखमी

राजस्थानच्या लक्ष्मणगड येथील दुर्घटना

शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा 22 तासांपासून नॉट रिचेबल

शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा 22 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. उमेदवारी नाकारल्यानं वनगा नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. दोन्ही फोन स्विच-ऑफ केल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.

राजस्थानात बस अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू, 24 जखमी

राजस्थानमध्ये बस अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बसने पुलाला जोरदार धडक दिली आहे. उड्डाण पुलावरुन बस कोसळली आहे. राजस्थानच्या लक्ष्मणगड येथे दुर्घटना घडली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. खोटा नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगावे लागेल, असं त्यांनी एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आमदार अमिन पटेल यांनी मुंबादेवी विधानसभा मतदार संघातून भरला अर्ज

आमदार अमिन पटेल यांनी आज मुंबादेवी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी खासदार वर्षा गायकवाड आणि शिवसेनेचे अरविंद सावंत उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता बसणार- गिरीश महाजन

महाराष्ट्राचे संकट मोचन म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन आज यांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज भरला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे महायुती तर्फे या ठिकाणी मोठे शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले यावेळी गिरीश महाजन यांनी लोकशाहीशी बोलताना म्हटले की उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा ह्या महायुतीच्याच येतील व महाराष्ट्रामध्ये महायुतीचीच सत्ता बसेल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री असणार असे यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

अभिजीत बिचुकले बारामतीच्या रिंगणात

अभिजीत बिचकुले यांनी बारामतीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पवार विरुद्ध पवार लढाईमध्ये अभिजीत बिचकुले याने उडी घेतली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे