लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप

Siddhi Naringrekar

नाशिक जिल्ह्यात 2 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश

नाशिक जिल्ह्यात 2 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जमावबंदीच्या काळात शस्त्र बाळगण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

संजय शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटीत दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप

विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीने आरोप केला आहे.विरार पूर्वच्या मनवेलपाडातील विवांता हॉटेलमध्ये राडा पाहायला मिळत आहे.

पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारांकडून ब्रीद वाक्यांचा वापर करत फ्लेक्सची लावण्यात आले असून प्रचाराची वेळ उलटून गेल्यानंतर सुद्धा उमेदवारांकडून प्रचार अजूनही सुरूच आहे.

शेतकऱ्यांकडून पुन्हा 'चलो दिल्ली'ची हाक

शेतकऱ्यांकडून पुन्हा 'चलो दिल्ली'ची हाक देण्यात आली आहे. शेतकरी 6 डिसेंबर रोजी पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत.

रायगडमध्ये 267 एसटी बसेसचा निवडणुकीसाठी वापर

रायगडमध्ये 267 एसटी बसेसचा निवडणुकीसाठी वापर करण्यात येणार आहे. मतदान यंत्र, कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी बसेसचा वापर केला जाणार आहे.

मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध

मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणेही घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.

मतदानाच्या दिवशी मेट्रोच्या सेवा कालावधीत वाढ

मतदानाच्या दिवशी मेट्रोच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात आली आहे. भुयारी मेट्रो पहाटे 4 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत धावणार असून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' उशिरापर्यंत धावणार आहे.

उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रावरील पोलिंग पार्ट्या आज रवाना होणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 4,631 मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

निवडणुकीनिमित्त एसटीच्या नऊ हजार बस धावणार

राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत.

उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काहीच वेळात मतदान यंत्र वाटपाला होणार सुरुवात

उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काहीच वेळात मतदान यंत्र वाटपाला सुरुवात होणार आहे. पुणे शहरात विधानसभा निहाय केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार असून पुणे शहरातील ८ मतदारसंघ निहाय केंद्रावरून वाटप होणार आहे.

निवडणुकीनिमित्त एसटीच्या नऊ हजार बस धावणार

राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

पुण्यात दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश, संशयितांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रचाराच्या तोफा थंडावल्याने छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. छुप्या प्रचारावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

कळमनुरीत डॉ. दिलीप मस्केंवर प्राणघातक हल्ला

कळमनुरीत डॉ. दिलीप मस्केंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सभा आटपून परत येताना वाहनावर दगडफेक करण्यात आली असून हल्ल्यामध्ये दिलीप मस्के गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम

अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक झाली. प्रचारसभा आटोपून घरी परत येताना अज्ञातांकडून वाहनावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत.

विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप, बविआ आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले, विरारमध्ये राडा

रायगड जिल्ह्यात निवडणुकीची जय्यत तयारी; मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त

BJP Vs Congress | चंद्रपूरच्या कोसंबीत भाजप - काँग्रेसमध्ये मोठा राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकल्या

बारामतीत नाट्यमय घडामोडी! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर रात्री सर्च ऑपरेशन

Ramesh Kadam | 'बाबा सिद्दिकींसारखा प्रकार माझ्यासोबत होऊ शकतो', रमेश कदम यांच्या जीवाला धोका