शिवाजी पार्कवरील 17 तारखेची राज ठाकरेंची सभा रद्द करण्यात आली आहे. 17 तारखेला ते सभेऐवजी महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
भाजपातून ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तडीपारीची नोटीस. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे आज करणार होते आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विक्रम नागरे यांच्यासह वंचित मधून भाजपात येणाऱ्या पवन पवार यांनाही तडीपारची नोटीस.
आदित्य ठाकरेंची आज माहिमध्ये प्रचारसभा होणार आहे. उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे.
पुण्यातील हडपसर येथील इमारतीतील एका घराला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून घरातील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात येत असून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.
लग्नसराईत ग्राहकांसाठी खुशखबर असून दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. पंधरा दिवसांत दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५,७०० रुपयांनी कमी होऊन गुरुवारी ७४,५०० रुपये आणि चांदीचे दर तब्बल ११ हजार रुपयांनी उतरून ८९ हजार रुपयांवर स्थिरावले. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने ९०० रुपये व चांदीचे दर १,८०० रुपयांनी घसरले. शेअर बाजारातील तेजीमुळे दर घसरल्याचे सराफा म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून ओळख असणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात उभा असलेले सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ अकरा वाजता सिल्लोड या ठिकाणी प्रचार सभा होत आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या गृहमतदानाला सुरुवात झाली. गृहमतदानाच्या पहिल्या दिवशी 2559 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज 2 सभा असून बारड,सांगोल्यात प्रचारसभेचं आयोजन करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंची तोफ आज नाशिक जिल्ह्यात धडाडणार असून मनमाड आणि मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे.
शरद पवार यांचा आज कोल्हापूर आणि सांगली दौरा असून कोल्हापूरमध्ये तीन उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवारांच्या सभा आहेत.
केंद्रीय मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून अमित शाह यांच्या यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आहेत.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आज नाशिक दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्योजक, वकील, व्यावसायिकांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असून याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.