लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

Published by : Siddhi Naringrekar

युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची होणार असून युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार आता मैदानात उतरले आहेत रोहित पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असून आज रोहित पवार ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत

सुधीर मुनगंटीवारांच्या पत्नी प्रचाराच्या रिंगणात

सुधीर मुनगंटीवारांच्या पत्नी प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. सपना मुनगंटीवारांकडून ग्रामीण भागात गावसभा सुरू आहे. सुधीर मुनगंटीवारांना आशीर्वाद देण्याचं आवाहन सपना मुनगंटीवार जनतेला करत आहेत.

निवडणूक विभागाच्या चारचाकी वाहनाचा अपघात

ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील वृद्ध व अपंग मतदारांची मतदान प्रक्रिया पार पाडणारे पथक क्रं .५ चे निवडणूक विभागाचे कर्मचारी चारचाकी वाहनाने नवरगाव - रत्नापूर फाटा मार्गावर चारचाकी वाहनाने विदयुत खांबाला धडक देत शेतात जावून पलटली झाली . यात निवडणूक विभागाचे ३ कर्मचारी , एक पोलीस कर्मचारी , एक फोटोग्राफर व गाडीचालक असे सहा जणांचा समावेश होता . अपघातग्रस्त वाहनातील अपघात ग्रस्तांना किरकोळ जखमां झाल्या असून मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेचा अपघात हा वाहनाचे ट्रेअरींग लॉक झाल्यामुळे झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

संजीव खन्ना यांच्या सरन्यायाधीश पदाच्या शपथविधीला सुरुवात

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. ते देशाचे ५१ वे सरन्यायाधीश ठरले आहेत.

सिडको घरांसाठीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

सिडको घरांसाठीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोसाठी आता 11 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

देशाला आज नवे सरन्यायाधीश मिळणार

देशाला आज नवे सरन्यायाधीश मिळणार. न्यायमूर्ती संजीव खन्ना सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संजीव खन्नांना शपथ देणार आहेत.

राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गुरुवार व शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे

गाझामधील शाळा-रुग्णालयावर IDF चा मोठा हवाई हल्ला

इस्रायलने पुन्हा एकदा कहर केला आहे. सात महिन्यांत आठव्यांदा इस्रायलने मध्य गाझा येथील अल-अक्सा हॉस्पिटलवर बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक स्थानिक पत्रकार गंभीर जखमी झाला आहे.

जि. प. शिक्षकांच्या बदल्यांसाठी कायमस्वरूपी वेळापत्रक ठरले

जि. प. शिक्षकांच्या बदल्यांसाठी कायमस्वरूपी वेळापत्रक ठरले आहे. राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या होणार असून 31 मेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज मुंबईत दोन जाहीर सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज मुंबईत दोन जाहीर सभा होणार आहेत. कुरार आणि दहिसर या दोन विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांची प्रचार सभा होणार आहे.

पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या होम वोटिंग आज पासून सुरू

पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या होम वोटिंग आज पासून सुरू होत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी होम वोटिंग सुविधा आज पासून सुरू होत असून 85 वयापेक्षा जास्त असलेले नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती घरबसल्या 12 डी फॉर्म भरून पोस्टर बॅलेटने मतदान करणार आहेत.

काँग्रेसच्या 16 बंडखोर उमेदवारांचं निलंबन

काँग्रेसच्या 16 बंडखोर उमेदवारांचं निलंबन करण्यात आले असून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

प्रीतम मुंडे आज केज विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

प्रीतम मुंडे आज केज विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने विविध गावांना भेटी देणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत सभा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत सभा होणार असून मालाड पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे.

नितिन गडकरींची आज जाहीर सभा

नितिन गडकरींची आज नागपुर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.

उद्धव ठाकरे यांची आज वाशिम बाजार समितीमध्ये जाहीर सभा

उद्धव ठाकरे यांची आज वाशिम बाजार समितीमध्ये जाहीर सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ देवळे यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा होणार आहे.

शरद पवार यांची आज जाहीर सभा

शरद पवार यांची आज शिंदखेडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप बेडसे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

आज लोहा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विराट जाहीर सभा

राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे उमेदवार प्रताप पाटील यांच्या प्रचारार्थ आज लोहा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विराट जाहीर सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रीरामपूरमध्ये 1 वाजता सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रीरामपूरमध्ये 1 वाजता सभा तर नेवासा येथे 3 वाजता जाहीर सभा

Latest Marathi News Updates live: आदित्य ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी

Vote For Amit Thakrey: अमित ठाकरे यांना मत का द्यावं?; संजय मोने यांची पोस्ट व्हायरल

Rahul Gandhi : भाजपच्या आदिवीसींविषयीच्या धोरणांवरुन राहुल गांधीची सडकून टीका

हरियाणा शिवसेना राज्यप्रमुख विक्रम सिंह यांना बिश्नोई गँगकडून धमकी

बीड/परळी: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मी पोटच्या मुलाप्रमाणे जपला - पंकजा मुंडे