लोकशाही लाईव्ह ब्लॉग

निवडणूक आयोगचा पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, 'ट्रंम्पेट' चिन्हाचे मराठी भाषांतर 'ट्रंम्पेट'

Published by : Team Lokshahi

साईबाबांची शिर्डी 11 हजार दिव्यांनी उजळली 

साईबाबांच्या शिर्डीत दीपउत्सव साजरा करण्यात आला दीपावलीच्या दिवशी साईबाबांनी पाण्याने दिवे लावले होते अशी अख्यइका आहे. साईबाबांच्या हायती पासून दीपावली उत्सव शिर्डीत साजरा होत आहे आजही दीपउत्सव साजरा करत अखंड परंपरा सुरू आहे.साईबाबांच्या द्वारकामाई समोर 11 हजार दिवे प्रज्वलित करून साई मेरे भगवान, हॅपी दीपावली,हा संदेश देण्यात आला आहे.यावेळी शिर्डी ग्रामस्थासह देश विदेशातील आलेल्या साईभक्तांनी दीप उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला..

तख्तस्नान कार्यक्रमाने नांदेडच्या जगप्रसिद्ध गुरुद्वारा मध्ये दिवाळी सणाला सुरुवात

नांदेडच्या जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारामध्ये तख्तस्नान कार्यक्रमाने दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे.गोदावरी नदीतून घागरीने पाणी आणून गुरुद्वारा आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली.मागील तीनशे वर्षा पूर्वी पासून ही परंपरा सुरु आहे.या तख्तस्नान कार्यक्रमामध्ये देश विदेशातील शीख भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यानंतर दीपोत्सवा सह विविध कार्यक्रम सचखंड गुरुद्वारा मध्ये पार पडणार आहेत.

दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई

शिवाजी पार्क दादरच्या दिवाळीनिमित्ताने संपूर्ण परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रोशनी पाहण्यासाठी मुंबईकर तसेच अन्य ठिकाणचे लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे.

निवडणूक आयोगचा पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, 'ट्रंम्पेट' चिन्हाचे मराठी भाषांतर 'ट्रंम्पेट'

शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. 'ट्रंम्पेट' चिन्हाचे मराठी भाषांतर 'ट्रंम्पेट' असे होणार. लोकसभा निवडणुकीत 'ट्रंम्पेट' चिन्हाचा राष्ट्रवादी कॉंग्रेस (SP)ला फटका बसला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत चिन्ह 'तुतारी' आहे तर 'ट्रंम्पेट' या चिन्हाचे मराठी भाषांतरही 'तुतारी' होते.

अकोल्यात मनसेच्या कार्यालयाची तोडफोड

अकोला जिल्ह्यातील मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. या घटनेनंतर, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा असून, आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही संबंधित उमेदवारावर केला जात आहे. त्यातून, त्यांच्या मनसे कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

जयंत पाटलांच्या विरोधात आचारसंहिता भंगची तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या विरोधात सांगली मध्ये काँग्रेसकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहेत. इस्लामपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या मालकी हक्कावरून काँग्रेसकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्यामुळे इस्लामपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस मधील कार्यालयाचा वाद आता पुन्हा उफाळून आलाय,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असणारी इमारत ही काँग्रेसच्या मालकीची जागा असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रचार कार्यालय सुरू करताना संबंधित जागा मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे,मात्र ती घेण्यात आली नाही, त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग आहे,असा आरोप वाळवा तालुका काँग्रेस अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केला आहे.

यवतमाळमध्ये धावत्या एसटीबसला अचानक आग; संपूर्ण बस जळून खाक

यवतमाळ : प्रवासी घेऊन यवतमाळकडे परत येणारी एसटी महामंडळाची बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाल्याची घटना यवतमाळच्या धामणगाव मार्गावरील मोहा फाट्याजवळ घडली. एस टी महामंडळाची बस ही प्रवासी घेऊन यवतमाळ कडे येत होती अचानक धावत्या बसने पेट घेतल्याने चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबून प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान येथील नागरिकांनी अग्निशमन दलाला प्राचारण केल्याने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन बसवर पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आली.

अमित ठाकरेंनी अर्ज मागे घ्यावा, राज ठाकरे यांना भेटून विनंती करणार : सदा सरवणकर

मुंबईतील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघ म्हणजे दादर माहीम मतदारसंघ. कारण या मतदारसंघात उमेदवार आहेत ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेतून सध्याचे विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कुठेतरी सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी अशा राजकीय चर्चा होत असताना 'आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा अशी विनंती करणार' असल्याचे सदा सरवनकर यांनी लोकशाही मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

मनसेचा दीपोत्सव म्हणजे आचारसंहितेचा भंग; अनिल देसाईंची निवडणूक आयोगात तक्रार

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवाजी पार्क येथे दिवाळीत दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवात मोठी आणि आकर्षक रोषणाई, दिव्यांची झगमगाट आदी पाहायला मिळत आहे. यावरुन दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सचिव अनिल यांनी केला आहे. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला तक्रार करणारे पत्र लिहिलंय.

झारखंडमध्ये दिवाळी सणाला गालबोट; फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग

झारखंडमध्ये दिवाळी सणाला गालबोट

झारखंडच्या बोकारोमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग

अग्नीशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

दुकानाला लागलेल्या आगीचं कारण अस्पष्ट

Sunil Tatkare | कोकणात काँग्रेसला एकही जागा नाही, सुनिल तटकरे यांनी काँग्रेसला डिवचलं

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोकणात काँग्रेसचे स्थान काय हे आघाडीतील घटक पक्षांनी दाखवून दिलंय. कोकणात काँग्रेसची मित्र पक्षाकडून झालेली अवहेलना त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार हताश पणे अनुभवत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दुर्घटना; चार ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले

आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी माढा तालुक्यातील खैराव येथे एक दुर्घटना घडली आहे. चार ऊसतोड मजूर सीना नदीपात्रात बुडाले आहेत. हे सर्व मजूर यवतमाळ जिल्ह्यातील असून ऊसतोड साठी या भागात आले होते. आज दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून अद्याप या पैकी एकाचाही शोध लागलेला नाही.

Rohit Patil | तासगावच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, रोहित पाटील नावाचे 4 उमेदवार रिंगणात | Lokshahi

रोहित पाटलान विरोधात आणखीन तीन रोहित पाटील तासगावच्या मैदानात ! डमी उमेदवार देऊन रोहित पाटलांना घेरण्याचा प्रयत्न असल्याचा रोहित पाटील गटाचा आरोप.

'लष्करी ऑपरेशनसारखं पक्षफोडीचं ऑपरेशन राबवलं' पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल

पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना शिवसेना पक्ष फोडण्यासाठी लष्करी ऑपरेशनसारखं ऑपरेशन राबवलं असल्याचा आरोप केला. यामुळे मोदींचं 'न खाऊंगा न खाने दुंगा' वाक्य हास्यास्पद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; आमदार जयश्री जाधवांचा शिवसेनेत प्रवेश

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय