राज्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघात डमी उमेदवाराची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक पूर्वमधून गणेश गीते नावाचे दोन उमेदवार असून डमी उमेदवारामागे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा आहे.
अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला. मेसेज करणाऱ्या व्यक्तीकडून 2 कोटींची मागणी करण्यात आली.
उदय सामंतांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. रत्नागिरीत 5 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. राजन साळवींचा प्रचारासाठी उद्धव ठाकरे रत्नागिरीत येणार आहेत. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
आमदार सुहास कांदेंविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ, धमकीप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला आहे. विनोद शेलार, शेखर पगारांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
पराग शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. पराग शाहांकडे 2 हजार 178 कोटींची संपत्ती असून निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. पराग शहांच्या संपत्तीत साडेचार पट वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
महविकास आघाडीची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. उमेदवारी अर्जाची प्रक्रिया संपताच बैठकीचं आयोजन करण्यात आले असून बैठकीत निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
उल्हासनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. कॅम्प तीन मधील गजानन मार्केट मधील दुकानाला आग लागली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुकानातील कपड्यांचे साहित्य जळून खाक झालं आहे.
अंकुश काकडे यांच्याकडे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असून आत्तापर्यंत शहराध्यक्ष राहिलेले प्रशांत जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने काकडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
झिशान सिद्दीकी,सलमान खान धमकी दिल्याप्रकरणी 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव गुरफान खान असल्याची माहिती मिळत आहे.
दिवाळी बाजारात व्होकल फॉर लोकलचा बोलबाला पाहायला मिळत आहे. देशभरात चीनी वस्तूंच्या विक्रीत मोठी घट झाली असून चीनला 1.25 लाख कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
शासन आपल्या दारी उपक्रमाला स्कॉच पुरस्कार जाहीर करण्यात आला असून 280 प्रकल्पांमधून शासन आपल्या दारीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर 38 लाखांचं सोनं जप्त करण्यात आले आहे. सोने कुठून व कशासाठी आले आहे याचा तपास पथकाकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी तासवडे टोलनाक्यावर सुद्धा सोने सापडले होते.
इस्रायलकडून गाझापट्टीत जोरदार हवाई हल्ले करण्यात आले असून या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राज्यात विधानसभेसाठी 7 हजार 995 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी तब्बल 4 हजार 956 अर्ज दाखल केले गेलेत