गाझापट्टीत इस्रायलकडून हवाई हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 पत्रकारांचा समावेश आहे. मृतांमध्ये बालकांचं प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. केसरकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दोन मिनिटांची चर्चा झाल्याचे कळतंय. दीपक केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन आल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. दादर माहीम मतदारसंघमध्ये राज ठाकरे यांच्या मुलाविरुद्ध शिवसेना शिंदे गटांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत चर्चा झाली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
साताऱ्याच्या कराडमध्ये 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका खासगी कारमधून 15 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. तासवडे टोलनाक्यावर नाकाबंदीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील बनावट जीएसटी कार्यालयाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बनावट कार्यालयावर इंटेलिजन्स विभागाने कारवाई केली आहे. बनावट कार्यालयातून तब्बल 8 हजार कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला असून फसवणूकप्रकरणी 10 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारमध्ये सापडले 15 लाख रुपये सापडले आहेत. तासवडे टोल नाक्यावर कारची तपासणी करत असताना ही रक्कम सापडली आहे.
राष्ट्रवादीच्या प्रचारमोहिमेचा आज शुभारंभ होणार आहे. अजित पवारांच्या हस्ते प्रचारगीताचे लॉन्चिंग होणार असून मुंबईतून सकाळी 9.30 वाजता प्रचार मोहीम सुरू होणार आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
विधानसभा इच्छुकासाठी अज्ञातांकडून फोन करत उमेदवारीसाठी 50 लाखांची मागणी केली आहे. पक्षाचे तिकीट मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली आहे. दोन संशयितांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुण्यात भाजपचा उमेदवार अजून ठरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस, मनसेचे उमेदवार जाहीर झाले आहेत. कसब्याच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये पेच कायम असल्याची माहिती मिळत आहे. भाजपकडून हेमंत रासने, धीरज घाटेंची नावं आघाडीवर असून मनसेने गणेश भोकरे तर काँग्रेसने विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.
पंढरपूर विधानसभेवरून भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आहे. समाधान आवताडे-प्रशांत परिचारक लढण्यावर ठाम असून या वादात चंद्रशेखर बावनकुळे मध्यस्थी करणार असल्याची माहिती मिळत असून चंद्रशेखर बावनकुळे पंढरपुरात जाऊन वाद सोडवणार असल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी रात्री भाजप नेत्यांची खलबतं झाली असून मुंबईतल्या तिढा असलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी सुजीत कुमारला पंजाबच्या लुधीयानामधून अटक केली आहे.
अमरावतीच्या दोन मतदारसंघात महायुतीमध्ये तिढा पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्जासाठी 4 दिवस उरले असून तिढा मात्र सुटताना दिसत नाही आहे. वरुड-मोर्शीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. 15 उमेदवारांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 नेत्यांच्या समावेश आहे.
उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील आणि उदय सामंत यांची भेट झाली. दोघामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत असून चर्चेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरण; डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर विरुद्ध फौजदारी खटला चालणार असल्याची माहिती मिळत आहे. तावरे, हळनोर आणि घटकांबळे यांच्या विरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचा प्रस्ताव पोलिसांनी सरकारकडे दिला होता. राज्य सरकारकडून याला मंजूरी मिळाली आहे.
अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानींच्या राजकीय भेटी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी सुद्धा अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
संगमनेरच्या धांदरफळ खुर्द येथे माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. यावेळी या प्रचारार्थ सभेत बोलताना वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले.
आमदार किशोर जोरगेवार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रक्षप्रवेश होणार असून जोरगेवारांना चंद्रपूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. काल काँग्रेसची दिल्लीत बैठकीत महाराष्ट्रातील जागावाटप आणि उमेदवारांच्या नावाचा हायकमांडने आढावा घेतला. आज उद्धव ठाकरेंची भेट घेऊन जागावाटपवर तोडगा काढणार असल्याची माहिती मिळत असून आजच्या बैठकीत अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.