लोकशाही लाईव्ह ब्लॉग

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

Siddhi Naringrekar

पुणे इंडिगो एअरलाइनच्या 20 विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुणे इंडिगो एअरलाइनच्या 20 विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ई-मेलवरून अज्ञाताने धमकी दिली असून विमान उडवून देण्याच्या धमकी देणाऱ्या अज्ञाता विरोधात विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर उत्तर मतदार संघासाठी जोरदार रस्सीखेच

कोल्हापूर उत्तर मतदार संघासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी काल रात्री 2 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याची माहिती मिळत असून आज शिवसेनेची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे.

भाजपचे दिग्गज नेते आज अर्ज भरणार

भाजपचे दिग्गज नेते आज अर्ज भरणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात, तर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार वांद्रे येथे तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही कुलाबा येथे शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार आहे.

'दाना' चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईवर होणार

अंदमान समुद्रात निर्माण झालेले दाना चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये हवामान प्रचंड खराब आहे. पश्चिम बंगालला धडकलेल्या 'दाना' या चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्यभरात ढगाळ व थंड वातावरण राहणार आहे.

मुंबई शहराची हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली

मुंबई शहराची हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. एक्यूआयच्या सर्वेक्षणानुसार मुंबईतील काही भागांमधील हवा खराब असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या वातावरणात सध्या धुकं वाढल्याचं पाहायला मिळत असून या खराब हवेमुळे मुंबईकरांमध्ये श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

राहुल नार्वेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

राहुल नार्वेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 11.30 वाजता नार्वेकर उमेदवारी अर्ज भरणार असून राहुल नार्वेकर महायुतीचे कुलाबा मतदारसंघातील उमेदवार आहेत.

नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का; भाजपचे माजी खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. प्रताप पाटील चिखलीकर यांचा सकाळी 8 वाजता पक्ष प्रवेश होणार आहे. मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार असून प्रताप पाटील चिखलीकरांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आज दाखल उमेदवारी अर्ज करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून भाजपचे उमेदवार असून अर्ज भरण्यापूर्वी आशिष शेलार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री दोन तास चर्चा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री दोन तास चर्चा झाली. बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. या बैठकीत यादी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याआधी देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट; म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमचा 'सेवक' पुन्हा एकदा येत आहे, तुमचे 'आशीर्वाद' घेण्यासाठी. भव्य नामांकन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा! असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भरणार उमेदवारी अर्ज

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरणार असून सकाळी 9 वाजता संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 'या' नव्या उमेदवारांच्या नावांची केली घोषणा

Cyclone Dana : 'दाना' चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईवर होणार

Zeeshan Siddique : झिशान सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार

महाविकास आघाडीचे संदीप नाईक यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल