बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पाच लाडक्या बहिणींसोबत धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पुण्यात झालेल्या पावसामुळे भातपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सिंहगड, राजगड -मुठा मधील 50 टक्के भातशेतीचं नुकसान झालं असून पुणे जिल्ह्यात भात पीकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगड, भोर, हवेली, मुळशीसह पश्चिम पट्ट्यातील पिवळं सोनं अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालं आहे.
साताऱ्याच्या खटाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असून मोळ, मांजरवाडीत रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण परिसरातील शेतपिकं वाहून गेली असून शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.
दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीला झळाळी आल्याचे पाहायला मिळत आहे. सोने 800 तर चांदी 150 रुपयांनी महागली असून सोने प्रतितोळा 79 हजार 500 रुपयांवर गेले आहे. चांदी जीएसटीसह 1 लाख 3 हजारांवर पोहोचली आहे.
अकोल्याच्या सोनाळा गावातील ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मोर्णा नदीच्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी त्यांची असून पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
जळगावच्या अमळनेरमध्ये 16 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. चोपडाई चेक नाक्यावर कारमधून रोकड जप्त केली असून निवडणूक भरारी पथक आणि पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रोकड एका व्यापाऱ्याची असल्याची माहिती मिळत आहे.
आज भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत आज दिवसभर महायुतीच्या मॅरेथॉन बैठका होणार असल्याची माहिती मिळत असून बैठकीत भाजपच्या 18 ते 20 जागांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडून देण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. 11 विमानं बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून अज्ञाताकडून ट्विटवर हा धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. नामांकित विमान कंपनीच्या मॅनेजरला ट्विटरवर ही धमकी मिळाली.
समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. 28 ऑक्टोबरला समीर भुजबळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 2 ते 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. लेबर कॅम्पसाठी ही पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. घटनास्थळी रुग्णावाहिका दाखल झाल्या आहेत.
आदित्य ठाकरे सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीच्या नेत्याची दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होणार आहे. तिढा असलेल्या जागांबाबत अमित शाहांशी चर्चा होणार असून महायुतीत 105 जागांबाबत तिढा असल्याची माहिती मिळत आहे.
गणित आणि विज्ञान विषयात दांडी गुल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 100 गुणांच्या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 35 गुणांची गरज असते मात्र आता 35 ऐवजी 20 गुणांची गुणांची गरज असणार आहे. 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी पास होता येणार असल्याची माहिती मिळत आहे.
निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले आहेत. हजारो कार्यकर्ते घेऊन अजित पवार यांना देवगिरी बंगल्यावर भेटणार असल्याची माहिती मिळत आहे.
छगन भुजबळ यांचा येवल्यातून उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत. भुजबळ शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून गुरुवारी सकाळी 10 वाजता येवला येथे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू आणि 14 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
दाना चक्रीवादळ उद्या पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टीला धडकणार असल्याची माहिती मिळत आहे. किनारपट्टी भागात एनडीआरएफची 56 पथक तैनात करण्यात आली असून लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचं काम सुरू आहे.
ठाण्यात राजकीय पक्षांची उमेदवारी अर्जासाठी लगबग. राज ठाकरेंच्या उपस्थित मनसेचे अविनाश जाधव आणि राजू पाटील भरणार अर्ज तर जितेंद्र आव्हाडांसाठी शरद पवार ठाण्यात येणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे जाणार होते.