लोकशाही लाईव्ह ब्लॉग

कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापलं; राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल

Siddhi Naringrekar

धनंजय मुंडे उद्या करणार उमेदवारी अर्ज दाखल

धनंजय मुंडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शक्ती प्रदर्शन होणार नाही असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितले असून अर्ज दाखल करण्यासाठी पंकजा मुंडे आणि महायुती मधील नेत्यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापलं

कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल उपस्थित करत बॅनरबाजी केली आहे. 'आजचा सत्कार, सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस' असा उल्लेख करत बॅनरबाजी करण्यात आली आहे.

इंदापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी

इंदापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी. प्रवीण माने अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असून शक्तिप्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत गावकऱ्यांनी घेतली शपथ

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील गावकऱ्यांनी शपथ घेतली आहे. कुठल्याही राजकीय पक्षांच्या प्रचार, बैठक किंवा सभेला न जाण्याची भूमिका लोणी खुर्द येथील गावकऱ्यांनी घेतली आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट

पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. पोलिसांच्या अर्जावर 18 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. अर्जावर सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला जाणार आहे.

वाशिममध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

वाशिममध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पोहोरादेवीचे महंत सुनील महाराजांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे भेटीची वेळ देत नसल्याचं सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी

मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी असल्याची माहिती मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाने ठराव करून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव केला आहे.

सचिन वाझेला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा

सचिन वाझेला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. 100 कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी दाखल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले असून गुवाहाटीवरून मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माजी खासदार निलेश राणे हाती धनुष्यबाण घेणार

माजी खासदार निलेश राणे हाती धनुष्यबाण घेणार असून कुडाळमधील मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजच्या सभेत निलेश राणे यांचा पक्षप्रवेश होणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का

भाजपला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे 28 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार

मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे 28 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असून संदीप देशपांडे यांना वरळीमधून उमेदवारी मिळाली आहे. 24 ऑक्टोबरला वरळीमधील मनसेच्या कार्यालयाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही पहिली यादी जाहीर केली असून 45 उमेदवार जाहीर केले आहेत.

कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापलं; राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल

मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत गावकऱ्यांनी घेतली शपथ; घेतला 'हा' मोठा निर्णय

वाशिममध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पोहोरादेवीचे महंत सुनील महाराजांचा पक्षाला रामराम

मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी

Nilesh Rane : निलेश राणे आज शिवसेनेत प्रवेश करणार