लोकशाही लाईव्ह ब्लॉग

राष्ट्रवादीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार

Siddhi Naringrekar

देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 66.57 अंकांनी घसरुन 78,667 अंकांवर पोहाचला.

राष्ट्रवादीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार

राष्ट्रवादीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार. अजित पवारांच्या उपस्थितीत याचे प्रकाशन होणार आहे.

आदित्य ठाकरे यांचा आज मुंबईत रोड शो

महाविकास आघाडीच्या वडाळा विधानसभेच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता रोड शोला सुरवात होणार आहे. इकीकडं उद्धव ठाकरे यांच्या सभा आजपासून सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील प्रचाराच्या मैदानात उतरले असून मुंबईत प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धमकी देणाऱ्याने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीवजा मेसेज मु़ंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला. दिला आहे.

राहुल गांधी उद्या नागपूर दौऱ्यावर

राहुल गांधी उद्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. नागपुरात संविधान संमेलनात हजेरी लावणार असून ओबीसी युवा मंचच्यावतीनं संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यात प्रचाराच्या रणधुमाळीला आजपासून सुरुवात होणार

पुण्यात प्रचाराच्या रणधुमाळीला आजपासून सुरुवात होणार आहे. पुण्यात तीन ठिकाणी काँग्रेसचे बंडखोर रिंगणात उतरले आहेत. कसबा, पर्वती, शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर निवडणूक लढवणार आहेत.

आमदार सुनील राऊतांविरोधात गुन्हा दाखल

आमदार सुनील राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा सुनील राऊतांवर आरोप असून विक्रोळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसबा ताब्यात घेण्यासाठी भाजप मैदानात

कसबा ताब्यात घेण्यासाठी भाजप मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. कसब्यासाठी भाजपकडून खास रणनीती आखली जात आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत असून रणनीतीसाठी भाजपकडून बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे.

पुण्यात दिवाळीत 60 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या

पुण्यात दिवाळीत 60 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागण्याची घटना घडली असून सुदैवाने आगीच्या घटनांमध्ये कुणीही गंभीर जखमी नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फक्त 6 दिवसांत 21 सभांचा धडाका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फक्त 6 दिवसांत 21 सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. आज नागपूरमधील रॅलीनंतर कोल्हापूरमध्ये महायुतीच्या सभेला हजेरी लावणार आहेत.

संभाजीनगरमध्ये अकबरुद्दीन ओवैसींची सभा

संभाजीनगरमध्ये अकबरुद्दीन ओवैसींची सभा आयोजित करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या हमखास मैदानात सभेचं आयोजन एमआयएमच्या उमेदवारांसाठी अकबरुद्दीन ओवैसी मैदानात उतरणार आहेत.

नागपुरात आज फडणवीसांची प्रचार रॅली

नागपुरात आज फडणवीसांची प्रचार रॅली निघणार आहे. दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये जनसंपर्क रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भरत पेट्रोलपंप चौकातून रॅलीला सुरुवात होणार आहे.

युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होत आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले असून आज शरद पवार शिरसुफळ सुपा,मोरगाव,सोमेश्वर या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.

धुळ्यात 70 लाखांची रोकड जप्त

धुळ्यात 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली असून मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या कारमधून ही रोकड जप्त केली आहे.

विदर्भात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

विदर्भात आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार असून आज वणीमध्ये 6 वाजता जाहीर सभा होणार आहे.

कोल्हापूरमध्ये महायुतीची पहिली संयुक्त सभा होणार

कोल्हापूरमध्ये महायुतीची पहिली संयुक्त सभा होणार असून सभेला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान

आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी होणार मतदान होणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

दिवाळीनंतरही हवेची गुणवत्ता खराबच

मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली आहे. दिवाळीच्या दिवसांत झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईच्या हवेचा दर्जा पहिल्या दिवसापासून ढासळला होता. दिवाळीनंतरही हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभांना आजपासून सुरुवात

उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभांच्या धडाक्याला आजपासून सुरुवात होणार आहे. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचार सभांना उद्धव ठाकरे सुरुवात करणार आहेत.

राज ठाकरे यांना बाळासाहेब माफ करणार नाहीत- संजय राऊत

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांचा आज मुंबईत रोड शो | Marathi News

हिना गावित यांची राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या...

Sharad Pawar यांच्या प्रचारसभांचा धडाका, 55 प्रचारसभांचे आयोजन

दहावीच्या परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत अर्ज भरता येणार