लोकशाही लाईव्ह ब्लॉग

23 तारखेला आयटम बॉम्ब फुटणार-एकनाथ शिंदे

Team Lokshahi

भाऊबिजेच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांकडून संपाचा इशारा

यंदा बेस्ट कर्मचाऱ्यांवर बोनसविनाच दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. दरवर्षी दिवाळीच्या आदल्या दिवशी येणारा बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज भाऊबिजेच्या दिवशी संपाचा इशारा दिला आहे.

स्पेन 12 वर्षांनंतर युरो कप 2024च्या अंतिम फेरीत

युरो कप 2024 स्पेन विरुद्ध फ्रान्सच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेनने शानदार विजय मिळवत 12 वर्षांनी अंतिम फेरी गाठली आहे.स्पेनने तब्बल 12 वर्षांनंतर युरो कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. जर्मनीच्या बर्लिनमधील अलियान्झ एरिना येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा 2-1असा पराभव केला. स्पेनच्या विजयाचे नायक दानी ओल्मो आणि 16 वर्षीय लॅमिने यामल होते. स्पेनने अवघ्या 4 मिनिटांत फ्रान्सविरुद्ध दोन गोल केले.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने मोठी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर सुरक्षा दलाचे चार जवान घायाळ झाले आहेत.श्रीनगरमधील खानयारमध्ये सुरक्षा दलाकडून ऑपरेशन राबवलं जात आहे.

देशात विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा जगदीश ऊइके अटकेत

देशात विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्रकरण समोर आलं आहे. आरोपीची सायबर सेलकडून कसून चौकशी सुरू असताना चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला, या आरोपीचं नाव आरोपी जगदीश ऊइके असून त्याला आता अटक करण्यात आली आहे.

बारामती ग्रामीण मधील तरुण मुलांनी दादांसाठी बनवला अनोखा संदेश देणारा बॅनर..!

बारामती मतदारसंघातील रुई या गावी उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले. यावेळी दादांना भेटण्यासाठी सर्व गावातील नागरिक एकत्र आले होते. या ठिकाणी काही तरुण मुले एक बॅनर घेऊन उभे दिसले. त्या बॅनर कडे गावातील सर्व मतदारांचे लक्ष गेले. कारण त्यामध्ये तरुण मुलांनी आपल्या गावातील पालकांसाठी एक महत्त्वाचा संदेश दादांच्या नावाने लिहिला होता. तू म्हणजे, आमचे भविष्य ज्योतिषाकडे जाऊन बघू नका, तर अजित दादांना मत देऊन बघा..! दादांचे भविष्यातील मतदार आम्ही रुईकर. अशा आशयाचे बॅनर त्यांनी दादांसमोर झळकावले, तरुण मुलांच्या बॅनरची चर्चा गावभर झाली.

दोन खाजगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, अपघातात 1जन ठार.

वाशिमच्या कामरगाव जवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन खाजगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. खुराणा आणि रॉयल ट्रॅव्हल्स मध्ये ही धडक झाली. दोन्ही ट्रॅव्हल्स मधील जखमींना अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

स्पेनमध्ये 8 तासांत 1 वर्षाचा पाऊस

स्पेनमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे 158 लोकांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, पुराचा सर्वाधिक परिणाम पूर्व स्पेनमधील व्हॅलेन्सिया शहराला झाला आहे. आतापर्यंत येथे 155 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. स्पेनच्या अलीकडच्या इतिहासात पुरामुळे इतक्या लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून मेसेज पाठवण्यात आला आहे. योगी यांनी १० दिवसात राजीनामा नाही दिला तर त्यांना बाबा सिद्धीकीसारखे मारू असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ देखील राज्यात प्रचार करण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

पुण्याची हवा धोकादायक पातळीवर

पुणे शहरातील हवेची गुणवत्ता आहे. दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी फटाके फोडले जात आहेत. परिणामी पुण्यात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित झाली आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे काही भागातील हवा तर धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. यामुळे श्वसनास त्रास होण्यासह आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. शुक्रवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर शहर आणि उपनगरांमध्ये हवेची गुणवत्ता 115 निर्देशंकावर पोहोचली आहे.

पुण्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळणार ?

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पुण्यात उद्योग विभाग अंतर्गत सर्व स्थापनांना अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना भर पगारी सुट्टी द्यावी किंवा दोन तासांची सवलत द्यावी असा याठिकाणी आदेश जारी करण्यात आलेला आहे.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत. दोघांमध्ये बंडखोरीबाबत चर्चा होण्याची शक्यता असून उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उरले फक्त 24 तास

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फक्त 24 तास उरले आहे. राज्यात एकूण 7 हजार 66 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पुढील 24 तासानंतर राज्यातील प्रमुख लढती निश्चित होणार असून बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुरू आहेत. पक्षांचे प्रमुख नेते बंडखोरांची समजूत काढण्यात यशस्वी होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

शिंदे-फडणवीस यांच्यातील 'वर्षा'वरील बैठक संपली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंची 'वर्षा'वरील बैठक संपली. पावणे तीन तास शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये खलबतं पाहायला मिळाली. बैठकीत बंडखोर नेत्यांच्या बाबतीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

नवाब मलिकांच्या जावयाचं निधन

नवाब मलिक यांच्या जावयाचं निधन झालं आहे. मलिकांचे जावई समिर खान यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासुन समिर खान यांच्यावर उपचार सुरु होते.

योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याला अटक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या 24 वर्षीय संशयित तरुणीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. 10 दिवसात राजीनामा दिला नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली होती.

मागच्या वेळी मंगेश कुडाळकर हे 24 हजार च्या लीडने जिंकले आता त्यांचं लीड हे पन्नास हजार ने म्हणजे दुप्पट झालं पाहिजे- मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून शिवसेनेची पहिली प्रचार सभा पार पडत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे पहिली जाहीर प्रचार सभा आहे. कुर्ला-नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी सभा होत आहे.

मंगेश कुडाळकर ओपनिंग बॅट्समन : एकनाथ शिंदे

मंगेश कुडाळकर हे आता ओपनिंग बॅट्समन झाले आहेत. तुम्हाला आता चौकार आणि षटकार मारायचे आहेत. आणि बाकीच्या लोकांना क्लीन बोल्ड आणि त्यांना गुल करायचे आहे-मुख्यमंत्री शिंदे

23 तारखेला आयटम बॉम्ब फुटणार-एकनाथ शिंदे

दिवाळी आहे काही ठिकाणी लवंग घ्या फुटत आहेत. पण आपला 23 तारखेला आयटम बॉम्ब फुटणार आहे- एकनाथ शिंदे

अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा दणदणीत विजय

'संविधान सिर्फ बहाना है लाल पुस्तक को...' भाजपकडून व्हिडिओ ट्विट करत दावा

जम्मू-काश्मीर विधानसभेत मोठा राडा; 370 कलम लागू करण्याच्या ठरावाला मंजुरी

गर्भधारणा आणि गर्भसंस्काराचे महत्त्व

लाडकी बहीण म्हणता...मग लाडके भाऊ काय मेले काय?; राज ठाकरेंचा सरकारला सवाल