नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाने मोठी कारवाई केली आहे. दिवाळीच्या दरम्यान विविध कारवाईंमध्ये 688 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली असून नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू करण्याचे आदेश नागपूर विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीच्या प्रचाराला 6 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तीन दिग्गज नेते घेणार एकत्रित सभा घेणार असून शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित प्रचार करणार असल्याची माहिती मिळत आहे.
परभणीत मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. भाजप आमदार मेघना बोर्डीकरांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाल्या आहेत.
ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. घर खरेदीसाठी दसरा, दिवाळीचा मुहूर्त अनेकांनी गाठला. महिनाभरात मुंबईत 13 हजार घरांची विक्री झाल्याची माहिती मिळत आहे.
दिवाळीचं रॉकेट बाल्कनीत पडल्यानं घराला आग लागल्याची घटना घडली आहे. बदलापूरच्या खरवई परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. घर बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.
फटाक्यांवरील निर्बंध, वायुप्रदूषण आणि न्यायालयीन बंधने यामुळे यंदा दिवाळीत वायुप्रदूषण कमी होईल, असा अंदाज होता. मात्र मुंबईकरांनी हा खोटा ठरवला आहे. दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातील हवा प्रदूषणाची पातळी गुरुवारी फटाक्यांमुळे वाढली. शहरातील शिवडी येथे अति वाईट हवेची नोंद झाली. तसेच इतर भागांतही हवेचा दर्जा वाईट श्रेणीत नोंदला गेला.
मुंबईत पुढील दोन दिवसही कमाल तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.