बीएस्सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. नियमित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही 1500 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. 1500 जागा रिक्त असल्यानं प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी जप्त केली 80 कोटी रुपयांची चांदी जप्त केली आहे. चांदीचं एकूण वजन 8 हजार 476 किलो असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.
पोर्श कार अपघात प्रकरणी आणखी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अविनाश सूद, आशिष मित्तल अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींचा जामीन विशेष कोर्टानं फेटाळला आहे. दोन्ही आरोपी येरवडा कारागृहाच्या कोठडीत आहेत.
'4 ते 5 दिवस राहिले सोयाबीन विकू नका', यशोमती ठाकुरांचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. सोयाबीनला 7 हजारांचा दर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आमचं सरकार आल्यास सोयाबीनला चांगला दर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्यात आलं आहे. गिरगाव महानगर दंडधिकारी न्यायालयाने अहवाल स्वीकारला आहे. गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
'अजित पवारांच्या फेसबुक पेजवर 43 लाख खर्च' काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवारांच्या निवडणूक खर्चाबाबत मोठा आरोप करण्यात आला आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाला 40 लाख रुपयांची मर्यादा असताना अजित पवार यांनी फेसबुक पेजसाठी 43 लाख खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मल्लिकार्जुन खरगे आणि जे पी नड्डा यांना निवडणूक आयोगाची नोटीस बजावली आहे. भाजपा आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. दोन्ही पक्षांच्या प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर नोटीस देण्यात आली आहे.
वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवाराला काळं फासलं आहे. अपक्ष उमेदवाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं आक्रमक झाले. व्हिडीओ काढून माफी देखील मागायला लावली आहे. बीडच्या अंबाजोगाई शहरातील प्रकार समोर आला आहे.
कल्याण शील फाटा रोडवरील निवडणूक भरारी पथकाने वाहन तपासणीदरम्यान एटीएमच्या व्हॅनमध्ये साडेपाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे, एकूण रक्कम साडेपाच कोटी असल्याचे समजते, मात्र, या रक्कमेची कोणतीही कागदपत्र नसल्याने ही गाडी ताब्यात घेतली आहे, ही एटीएम व्हॅन न्यू मुंबई वरून डोंबिवली कडे येताना शिळफाटा या चौकामध्ये निवडणूक भरारी पथकाने अडवले आहे,
अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केलं आहे. भावनिक होऊ नका, बारामतीकरांना कुणी वाली नाही. विधानसभेला गंमत करु नका, तुमची जंमतच होईल. अजित पवारांच्या वक्तव्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकांनी म्हणावं लागतं, आपण म्हणून उपयोग नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून निवडणूक काळात शेवटच्या टप्प्यात घेरलं आहे. खेड तालुक्यातील पश्चिम भागात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.